तुम्ही जर सोबत असता तर मी हे सर्व टीव्हीवर बघितलं असतं, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

जय श्री राम म्हणायचे आणि दिलेले वचन तोडायचे हे माझं हिंदुत्व नाही असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान (CM uddhav thackeray criticized Devendra Fadnavis) लगावला.

तुम्ही जर सोबत असता तर मी हे सर्व टीव्हीवर बघितलं असतं, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड (CM uddhav thackeray criticized Devendra Fadnavis) झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन (CM uddhav thackeray criticized Devendra Fadnavis) केलं. पण जर “तुम्ही माझ्यासोबत असता ना, तर मी हा सर्व कारभार टीव्हीवर बसून बघितला असता” असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहादरम्यान भाषणातून (CM uddhav thackeray criticized Devendra Fadnavis) लगावला.

“देवेंद्र फडणवीस तुमचं अभिनंदन तर आहे. कारण माझा मित्र तिथे बसला आहे. पण आज जर तुम्ही माझ्यासोबत असता ना, तर मी हा सर्व कारभार टीव्हीवर बसून बघितला असता. तुम्ही कशासाठी केलं काय केलं.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

गेल्या पाचवर्षात मी सरकाराला दगा देण्याचा प्रयत्न केला नाही. तुमच्या चांगल्या कामाआड माझी शिवसेना, माझा पक्ष येऊ दिला नाही. तेव्हाचं सर्व सहकारी आजही माझ्यासोबत आहे. त्यांनी ही मी सक्त ताकीद दिली होती. जे बोलायचे ते स्पष्ट बोलायचे कपट कारस्थान आणि काळोखात काही बोलायचे नाही. मध्यरात्रीचे खलबंत करायची नाही. असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला. पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी जर मला रात्रीचे बसायला लागलं तरी माझी सर्व तयारी आहे. असेही ते पुढे म्हणाले.

जेव्हा युती नव्हती तेव्हा आम्ही विरोधात होतो. त्यावेळीही आमचं हिंदुत्व होतं, आजही आहे, काल ही होत आणि उद्याही ते राहिलं. पण त्या हिंदुत्वामध्ये दिलेला शब्द पाळण हेसुद्धा माझं हिंदुत्व आहे. जय श्री राम म्हणायचे आणि दिलेले वचन तोडायचे हे माझं हिंदुत्व नाही असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान (CM uddhav thackeray criticized Devendra Fadnavis) लगावला.

“देवेंद्र फडणवीस तुमच अभिनंदन. आपण गेली 20-25 वर्षे एकत्र आहोत. आपला परिचय आज माझ्या हातात आला. तो आधी असता तर बर झालं असतं. कारण या दिवसाची या नात्याची मला अपेक्षा नव्हती.” असेही ते म्हणाले.

“एका दृष्टीने पाहिलं तर मी आतापर्यंतचा नशिबवान किंवा भाग्यवान मुख्यमंत्री आहे. कारण जे 25-30 वर्षे विरोधात होते ते माझे मित्र झालेत. आणि जे मित्र होते ते विरोधात बसलेत. म्हणून प्रामाणिकपणे वाटत की विरोधी पक्ष अस्तित्वात राहणार नाही कारण विरोधी पक्ष माझे मित्र आहेत.” असेही उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray criticized Devendra Fadnavis) म्हणाले.

“काल मी आल्यानंतर आपले इतक्या वर्षाचे संबंध आहेत. अभिनंदन केलं. कोणाला तरी वाटलं मी कानात काही तरी बोललो. मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे बंद दाराआड आणि कानात बोललं हे बाहेर सांगायची संस्कृती नाही. कारण बंद दाराआड़ काय बोललो हे बाहेर बोललो तर…मला नाही माहित बंद दाराआड कोणकोण काय काय करत असेल. म्हणून तशी आमची संस्कृती नाही,” असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

“विरोधक हा शब्द कुणी आणला, याचं संशोधन केले पाहीजे. इथे सर्वच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर आलेलो असू, तर मग विरोधक आणि सत्ताधारी असे वेगवेगळे का?” असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी विचारला.

“ज्या महापुरुषांच्या तस्वीरी येथे लावलेल्या आहेत. जर त्यांची नावे सभागृहात घ्यायची नसतील तर मग ते महापुरूष तस्वीरीतून काय विचार करत असतील.” असेही ते (CM uddhav thackeray criticized Devendra Fadnavis) म्हणाले.

“गेले अनेक वर्षे आपण सोबत आहात. मी नशीबवान, भाग्यवान मुख्यमंत्री आहे. जे 25 वर्ष विरोधात होते, ते आज मित्र आहेत. जे 25 वर्ष मित्र होते, ते आता विरोधक झाले आहेत.मी नशिबाने भाग्याने आलो आहे. मी इथे येईन असे मी कधीच बोललो नव्हतो. तरिही मला इथे यावं लागलं. आता आलो आहे तर आपल्याला जनतेची कामे करावी लागतील. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल.” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“इतके दिग्गज सभागृहात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मित्र माझ्यासमोर आहेत. देवेंद्र फडणवीस यांची मैत्री मी कधीच लपवलेली नाही. ती कालही होती, आजही आहे आणि राहील. त्यात कधीही अंतर पडणार नाही,” असेही ते म्हणाले.

“सत्ताधारी आणि विरोधक हे दोन विरुद्ध शब्द न राहता इथे लावलेल्या महापुरुषांच्या ज्या तस्वीरी आहेत, त्यांचा वारसा पुढे न्यायचे काम आपल्याला इथे कारायचे आहे. देवेंद्रजी मी आपल्याला विरोधी पक्षनेता म्हणणार नाही. तर या सभागृहातील
एक जबाबदार नेता म्हणून मी आपल्याकडे पाहीन,” असे मुख्यमंत्री म्हणाले.