मेट्रो कारशेडचा मुद्दा मोदींच्या कोर्टात; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना शह?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून त्यांच्याकडे कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा मुद्दा मांडला आहे. कांजूरच्या मेट्रोच्या जागेवर केंद्र सरकारने दावा केला आहे.

मेट्रो कारशेडचा मुद्दा मोदींच्या कोर्टात; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना शह?
cm uddhav thackeray


नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून त्यांच्याकडे कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा मुद्दा मांडला आहे. कांजूरच्या मेट्रोच्या जागेवर केंद्र सरकारने दावा केला आहे. केंद्राने ही जागा राज्याला द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मोदींकडे केली आहे. उद्वव ठाकरे यांनी मोदींकडे हा मुद्दा मांडून एकप्रकारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शह दिला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (cm uddhav thackeray demand Kanjurmarg plot for metro car shed to modi)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तब्बल पावणे दोन तासाच्या या भेटीत राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांकडे एकूण 12 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यात कांजूर कारशेडचा मुद्दाही होता. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडची जागा आम्हाला उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी मोदींकडे करण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मोदींचं समस्या सोडवण्याचं आश्वासन

पंतप्रधानांना भेटण्यासाठी आम्ही तिघे आलो, सचिवहीसोबत आहेत. राज्याचे विषय कोणते, कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे सर्वांना माहीत आहे. सर्व विषय मोदींनी गांभीर्याने ऐकून घेतले. प्रत्येक विषयांची पत्रंही आम्ही दिली आहेत. राज्यांचे अनेक विषय मांडले. त्याबाबत मोदींनी लक्ष घालतो असं सांगितलं. मोदी हे प्रश्न सकारात्मकपणे सोडवतील अशी अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काय आहे मेट्रोचा वाद?

कांजूरमार्ग येथील मेट्रोची जागा राज्याची आहे की केंद्राची यावरून वाद सुरू होता. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने कोर्टाने मेट्रोच्या कामाला शह दिला होता. त्यामुळे राज्याने पर्यायी जागेचा शोध सुरू केला होता. मात्र, पर्यायी जागेपेक्षा कांजूरचीच जागा मिळावी म्हणून ठाकरे सरकारने प्रयत्न सुरू केले होते. आजच्या भेटीत त्यांनी मोदींकडे ही जागा राज्याला देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मोदी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

फडणवीसांना शह?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कांजूरमार्ग येथील जागेवर कारशेड उभारण्यास विरोध केला होता. कारशेडसाठी मेट्रोचीच जागा योग्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे कांजूरच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार शाब्दिक चकमकीही झडल्या होत्या. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी हा विषय थेट मोदींच्या कोर्टात टाकला आहे. मोदींच्या कोर्टात कांजूरचा चेंडू टाकून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना शह दिल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आता कांजूरच्या मुद्द्यावर फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (cm uddhav thackeray demand Kanjurmarg plot for metro car shed to modi)

संबंधित बातम्या:

‘ते’ दुखणं कायमचं दूर करु, मुख्यमंत्र्यांसमोर अजित पवारांचा पंतप्रधान मोदींना शब्द

Udhav Thackeray PM Modi Meet Live | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात स्वतंत्र बैठक, अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती

VIDEO: मोदी-ठाकरे एकांतात भेटले; ‘ते’ 30 मिनिटे महाराष्ट्राच्या राजकारणाची कूस बदलणार?

(cm uddhav thackeray demand Kanjurmarg plot for metro car shed to modi)