AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना कुणाच्याही पालख्या उचलणार नाही, भाजपसोबत युतीच्या चर्चेवर ठाकरेंचा पडदा टाकण्याचा प्रयत्न? वाचा सविस्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातल्या दिल्ली भेटीपासून सेना-भाजप पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सुरु आहे. मोदींनी एखादा प्रस्ताव उद्धव ठाकरेंसमोर ठेवला असावा असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

शिवसेना कुणाच्याही पालख्या उचलणार नाही, भाजपसोबत युतीच्या चर्चेवर ठाकरेंचा पडदा टाकण्याचा प्रयत्न? वाचा सविस्तर
UDDHAV THACKERAY
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 10:13 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी यांच्यातल्या दिल्ली भेटीपासून सेना-भाजप पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सुरु आहे. मोदींनी एखादा प्रस्ताव उद्धव ठाकरेंसमोर ठेवला असावा असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. त्याबद्दल अधिकृतपणे भाजप किंवा सेनेच्या कुठल्याही नेत्यानं अजून वक्तव्य केलेलं नाही.संजय राऊत यांनी मात्र अलिकडच्याच सामनाच्या एका अग्रलेखात मोदी ठाकरे भेटीवर सविस्तर लिहिलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी सडेतोड भूमिका मांडत शिवसेना कुणाच्याही पालख्या उचलणार नाही हे स्पष्ट केलं आहे. हा इशारा फक्त भाजपालाच आहे की राष्ट्रवादीलाही याचीही चर्चा आता सुरु झाली आहे. (CM Uddhav Thackeray on Shivsena upcoming stand on Maharashtra politics also commented on alliance talks with BJP)

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

शिवसेनेचा वर्धापन दिन असतानासुद्धा उद्धव ठाकरेंनी राजकारण बाजुला ठेवण्याचा आदेश दिला. ते म्हणाले, अनेकवेळा नैसर्गिक आपत्ती येते, वादळं, पूर, दुष्काळ, साथ येते त्यावेळी सर्वात आधी धावून जातो तो शिवसैनिक. बदनाम करण्यासाठी आरोप करायचं आणि पळून जायचं. पण आरोप करतोय तू कोण आहेस, स्वत:चा चेहरा पाहिलाय का? आम्ही आमच्या रुबाबत चाललोय. जर शिवसेनेचं राजकारण हीन दर्जाचं असतं, तर शिवसेना टिकली नसती. राजकारण बाजूला ठेवा, आपल्या वर्धापन दिनी कार्यक्रम देतोय, गाव कोरोनामुक्त करा, असा कोणता पक्ष आहे का वर्धापन दिनी राजकारण बाजूला ठेवा असं सांगतोय’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘दुसऱ्यांच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसेना नाही, आम्ही स्वाभिमानाने चालू, आमच्या ताकदीवर चालू’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या ह्या वक्तव्याला महत्व का?

शिवसेना पक्षप्रमुखांच्या ह्या वक्तव्याला दोन पार्श्वभूमी आहेत. पहिली-मोदी आणि त्यांची दिल्लीत झालेली भेट आणि त्यानंतर राज्यात सेना-भाजप युती होणार अशी सुरु झालेली चर्चा. दुसरी-राष्ट्रवादी काँग्रेस अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपदावर दावा करणार अशी दबक्या आवाजातली आणखी एक चर्चा. दोन्हीही चर्चाच आहेत. पण दोन्ही सेनेच्या कोंडी करणाऱ्या आहेत. त्यामुळेच दुसऱ्यांच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसेना नाही, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला महत्व आहे. शिवसेनेची भूमिका काय असू शकते याचा अंदाज त्यांच्या ह्या वक्तव्यातून येऊ शकतो. अशा दबक्या आवाजातल्या चर्चा थांबाव्यात म्हणून तरी उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य केलं असावं असा अंदाज बांधला जातो आहे.

इतर बातम्या :

हाणामारी, रक्तपात हा आपला गुणधर्म नाही, मुंबई दंगलीवेळी शिवसैनिक जगाने पाहिला : उद्धव ठाकरे

‘…यालाच शिवसैनिक म्हणतात’, दादरमधील राड्यावर उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्ष निशाणा

(CM Uddhav Thackeray on Shivsena upcoming stand on Maharashtra politics also commented on alliance talks with BJP)

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.