आधी कोचिंग क्लासेसच्या शिष्टमंडळाशी बैठक, नंतर राज ठाकरेंचा थेट वर्षा गायकवाड यांना फोन

कोचिंग क्लासेसच्या सर्व मागण्या राज ठाकरेंनी सरकार दरबारी मांडाव्या यासाठीही भेट घेणार आहेत. (Coaching Class Delegation Meet MNS Raj thackeray)  

आधी कोचिंग क्लासेसच्या शिष्टमंडळाशी बैठक, नंतर राज ठाकरेंचा थेट वर्षा गायकवाड यांना फोन
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 12:18 PM

मुंबई : राज्यातील ग्रंथालय सुरु झाल्यानंतर आता कोचिंग क्लास पुन्हा सुरु करण्यासाठी मालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पालक संघटनेसह कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेत थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावला. यावेळी वर्षा गायकवाड यांनी संध्याकाळी याबाबत बैठक आहे. उद्यापर्यंत कळवतो, असे वर्षा गायकवाड यांनी राज ठाकरेंना सांगितले. (Coaching Class Delegation Meet MNS Raj thackeray)

राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अकरावीसह इतर इयत्तांचे प्रवेश रखडले आहेत. तर दुसरीकडे आर्थिक परिस्थितीमुळे कोचिंग क्लास मालकांचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर आज पालक संघ आणि कोचिंग क्लासेस मालक – शिक्षकांचे शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट झाली.

यावेळी कोचिंग क्लासचे शिष्टमंडळाने काही मागण्या राज ठाकरेंकडे मांडल्या. या मागण्या सरकार दरबारी मांडा, अशी विनंतीही या शिष्टमंडळाने राज ठाकरेंकडे मांडली.

यानंतर राज ठाकरेंनी क्षणाचाही विलंब न लावता थेट वर्षा गायकवाड यांना फोन केला. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं राज यांनी वर्षा गायकवाड यांना सांगितलं. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे राज यांना सांगितले.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनलॉक सुरु आहे. त्यानंतर डॉक्टर, कोळी महिला, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी या सर्वांनी राज ठाकरेंकडे विविध मागण्यांचं साकडं घातलं होतं. यानंतर काही समस्यांवर तोडगाही निघाला होता. त्यामुळे अनेकांना विश्वास वाटत आहे.

राज ठाकरेंना आतापर्यंत कोण कोण भेटलं?

  • मूर्तीकार
  • डबेवाले
  • जिमचालक
  • कोळी महिला
  • वीजबिल ग्राहक
  • पुजारी
  • डॉक्टरांचे शिष्टमंडळ
  • ‘अदानी’चे अधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला!

संबंधित बातम्या : 

राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, ग्रंथालय प्रतिनिधी राज ठाकरेंच्या भेटीला

Library Reopen | राज ठाकरेंना भेटताच ग्रंथालये सुरु, ग्रंथप्रेमींना दिलासा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.