Abhijit Dipke: डिग्री नसलेले लोक सरकार चालवत आहेत; अभिजीत दीपकेचा हल्लाबोल, खूप काही बोलून गेला

Abhijit Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी देशातील बेरोजगारीवर मोठे विधान केले आहे. त्यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे.

Abhijit Dipke: डिग्री नसलेले लोक सरकार चालवत आहेत; अभिजीत दीपकेचा हल्लाबोल, खूप काही बोलून गेला
अभिजीत दीपके
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 06, 2026 | 2:40 PM

कॉकरोच जनता पार्टीच्या एका आंदोलनाने संपूर्ण देशात खळबळ माजली. आता ही पार्टी भविष्यात कोणते कोणते बदल घडवून आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी देशातील बेरोजगारीवर मोठे विधान केले आहे. त्यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे. डिग्री नसलेले लोक सरकार चालवत आहेत असे अभिजीत दीपके म्हणाले आहेत.

काय म्हणाले अभिजीत दीपके?

छत्रपती संभाजीनगर येथून नुकताच कॉकरोच जनता पक्षाने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अभिजीत दीपके म्हणाले की, “आपल्या देशातील 60 टक्के लोक 35 च्या खालच्या वयातल्या आहेत, कोणाला वाटतं की मोठा झाल्यावर आम्ही डिलिव्हरी बॉय झाला पाहिजे? आपल्या देशात जॉब नाहीत म्हणून त्यांना ते मजबुरीने करावं लागतं. बेरोजगारी हा मोठा मुद्दा आहे. जेवढे बेरोजगार आहेत त्यातील 80 टक्के लोकांकडे डिग्री आहे. आता आपल्या देशातील लोकांना असं वाटत आहे आम्ही शिकून काही चुकी केली आहे का? ज्यांनी डिग्री घेतली नाही ते लोक सरकार चालवत आहेत.”

पुढे अभिजीत दीपके म्हणाले की, बेरोजगारीकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, हा राजकीय चर्चेचा विषय असला पाहिजे. GEN Zने दाखवून दिल आहे. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू. कोणताच एक व्यक्ती देशाचे सगळे प्रश्न सोडू शकत नाही असेच एक खोटं 2014 साली बोललो होतो. काशी बदल बोलले होते काशीचे काय झालं काशी झाली.

भविष्यात काय करणार?

अभिजीत दीपके यांनी सीजेपी भविष्यात काय करणार आहे याबाबत देखील वक्तव्य केले आहे. शिक्षण या मुद्द्यावर आम्ही पहिल्यांदा काम करू. आज आपल्या देशात शिक्षण परवडत नाही असं झालं आहे. पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षाची फीस एक ते दीड लाख रुपये आहे. ज्या परिवाराचं तेवढं इन्कम नाही तेवढे पैसे करून देतील. कोचिंगमध्ये पैसे जातो कॉलेजच्या डिग्री मध्ये पैसा जातो, आम्हाला यापासून मुलांना आणि त्यांच्या आई-वडिलांना मुक्त करायचा आहे. जर आई-वडिलांना त्यांच्या मुलांना डॉक्टर इंजिनिअर बनवायचे असेल तर त्यांना बर्डन नाही वाटला पाहिजे. गेल्या काही दिवसापासून भारतात शिक्षण व्यवस्था हा व्यवसाय झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us