AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढल्या, काँग्रेसच्या माजी महापौरांचा विरोध

सोलापूर शहर मध्य मतदार संघ हा मुस्लीम बहुल असल्याने मुस्लीम समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढल्या, काँग्रेसच्या माजी महापौरांचा विरोध
| Updated on: Jul 28, 2019 | 4:06 PM
Share

सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत अनेकांनी बंडाचे  हत्यार उपसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मातबर नेत्याची चांगलीच अडचण होणार आहे. सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधातही स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी बंड पुकारले आहे. शहर मध्य मतदार संघ हा मुस्लीम बहुल असल्याने मुस्लीम समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्या दुसऱ्यांदा पराभव झाला. त्याचे दुष्परिणाम दिसायला आता सुरुवात झाली आहे. कालपर्यंत शिंदे यांचा शब्द पाळणारे कार्यकर्ते आता त्यांच्यावर भलतेच नाराज झाले आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या अडचणी काहीशा  वाढल्या असून त्यांच्या विरोधात राजकारण सुरु असल्याचं चित्र दिसत आहे.

सुशीलकुमार शिंदे यांच्या जवळचे असणारे अनेक जण बंडाच्या पावित्रेत आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहर मतदार संघावर मुस्लीम समाजाने दावा केला आहे. हे दावा करणारे दुसरे तिसरे कुणी नसून काँग्रेसचे माजी महापौर आणि सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक यु.एन.बेरिया हे आहेत.

शहर मध्य मतदार संघात मोठ्या प्रमाणात म्हणजे तब्बल एक लाखांपेक्षा जास्त मुस्लीम मतदार संख्या आहे. मात्र असं असताना प्रत्येक वेळेस मुस्लीम समाजाला डावललं जात आहे. त्यामुळे यंदाच्या वेळेस आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वतःहून मतदार संघ सोडावा आणि मुस्लीम समाजाला उमेदवारी देण्याची मागणी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीकडे करण्यात आली आहे.

पक्षात अनेक निष्टावंत असताना आणि सक्षम उमेदवार असताना सुद्धा 2009 मध्ये अनेकांना डावलून नवख्या असलेल्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली गेली. तरीही मुस्लीम समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. 2009 आणि 2014 च्या दोन्ही निवडणुकीत प्रणिती शिंदेंना निवडून आणण्यात मुस्लीम समाजाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे यंदा उमेदवार मुस्लीम समाजाचाच असायला हवं असा आग्रह मुस्लीम नेत्यांनी धरला आहे. इतकच काय प्रणिती शिंदेना दुसऱ्या मतदार संघाचा विचार करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

एकीकडे मुस्लीम समाजाने आमदार प्रणिती शिंदेच्या शहर मध्यवर दावा केलेला असतानाच मतदार संघातील क्रमांक दोनवर असणाऱ्या आणि कॉंग्रेसची मोठी वोट बँक असणाऱ्या मोची समाजाने सुद्धा उमेदवारी मिळण्यासाठी आग्रह केला आहे.त्यासाठी मोची समाजाचे बैठकावर बैठकाचे सत्र सुरूच आहे ,

सोलापूर शहरातील विधानसभेच्या 3 जागापैकी शहर उत्तर हा जणू भाजपाचा बालेकिल्ला बनला आहे. त्यामुळे त्या मतदार संघातून निवडणूक लढायला धजावत नाहीय. तर तिकडे दक्षिण मतदार संघात सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी चांगलंच बस्तान बांधलय. उरलेल्या शहर मध्यच्या जागेवर आता या कॉंग्रेसजनांनी बंडाचा इशारा दिल्यामुळे आमदार  प्रणिती  शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय कौशल्य वापरून शिंदे त्यांची नाराजगी दूर करण्यात यशस्वी होतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anana Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी.

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक