AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाईकवरून आले अन् धाडधाड गोळ्या घातल्या… काँग्रेस नेत्याचा दिवसाढवळ्या मर्डर; राज्य हादरलं

शुक्रवारी काँग्रेस नेते आणि व्यावसायिक डेव्हिड डिसूझा यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. हत्या करणारा मुख्य आरोपी शूटरला पोलीसांनी अटक केली आहे.

बाईकवरून आले अन् धाडधाड गोळ्या घातल्या... काँग्रेस नेत्याचा दिवसाढवळ्या मर्डर; राज्य हादरलं
David D'Souza murderImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 08, 2026 | 11:44 AM
Share

देशातील गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शुक्रवारी थेट एका काँग्रेस नेत्याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोन तरुण मोटारसायकलवर आले आणि त्यांनी धाड धाड गोळ्या झाडल्या. काही हालचाल करण्यापूर्वीच काँग्रेस नेत्याची हत्या झाली. हत्येचा मुख्य आरोपी शूटरला बिंदूरजवळील ओट्टिनाने परिसरात पोलीसांनी घेरलं आणि अटक केली. या प्रकरणात इतर दोन आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

काँग्रेसच्या नेत्याची हत्या

कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि व्यावसायिक डेव्हिड डिसूझा यांच्या हत्येने खळबळ माजली आहे. त्यांची करणाऱ्या आरोपीची ओळख उत्तर प्रदेशचा निवासी राजू अशी झाली आहे. आरोपी राजूने कथितरीत्या पोलीस पथकावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी आत्मरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केला. आरोपीच्या उजव्या पायाला गोळी लागली. एसआय तेजस्वीही जखमी झाले आहेत. सध्या त्यांचे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी राजूचेही उपचार सुरू आहेत. त्याला मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचा: डॉक्टर इंजिनीअरपेक्षा जास्त पगार, ईशा अंबानीच्या मुलांना सांभळणारी नॅनी कोण?

नेमकं काय घडलं?

प्रकरणात इतर दोन आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. सध्या पोलीस पथके त्यांच्या शोधात आहेत. शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते, कंत्राटदार आणि ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष डेव्हिड डिसूझा यांची सरेआम गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी डेव्हिड डिसूझा यांच्यावर तीन फेऱ्या गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. हत्येनंतर ते दोघेही ताबडतोब तेथून पळून गेले होते.

हे आर्थिक वादाचे प्रकरण असल्याचे म्हटले जात आहे. मात्र पोलिस या प्रकरणात अतिशय सखोल चौकशी करत आहेत आणि पोलीस चौकशीनंतरच हत्येचे खरे कारण समोर येईल. डेव्हिड डिसूझा हे काँग्रेस नेते असण्यासोबतच कंत्राटदार आणि ग्रामपंचायतचे माजी अध्यक्षही होते.सध्या पोलिस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक तपासणीद्वारे पुरावे गोळा करत आहेत. पोलिस प्रकरणाशी संबंधित प्रत्येक पैलूची चौकशी करत आहेत.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात