AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Chavan | अशोच चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया काय?

Ashok Chavan | अशोक चव्हाण हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्याशिवाय त्यांनी आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिला आहे. त्यांचा फोन लागत नाहीय. त्यामुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलय.

Ashok Chavan | अशोच चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया काय?
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Updated on: Feb 12, 2024 | 1:12 PM
Share

Devendra fadnavis on Ashok chavan | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी आज विधान भवनात जाऊन राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर या चर्चेने जोर पकडला. आज दुपारी 12.30 च्या सुमारास नरीमन पॉइंट येथील भाजपा मुख्यालयात पत्रकार परिषद झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. काही माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. त्याचवेळी अशोक चव्हाण यांचा भाजपा प्रवेश होईल, अशी चर्चा सुरु झालेली. पण आज हा प्रवेश झाला नाही. भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

त्यावेळी पत्रकारांना गंमतीने म्हणाले, ‘मी तुमच्याकडूनच हे ऐकतोय’. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, “काँग्रेसमधले अनेक चांगले नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्या प्रकारे काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरु आहे, त्यातून जे जनतेचे नेते आहेत, जनतेशी कनेक्ट आहे, त्यांची गुदमर होतेय. देशभरात हाच ट्रेंड आहे. जनतेचे नेते भाजपामध्ये प्रवेश करतायत. काही मोठे नेते भाजपात येतील हा विश्वास आहे. तुम्हाला एवढच सांगेन आगे, आगे देखिये होता हैं क्या”

फोडाफोडीच टार्गेट घेऊन चालत नाही

“आम्ही असं फोडाफोडीच टार्गेट घेऊन चालत नाही. सगळ्याच पक्षातील लोक आमच्या संपर्कात आहेत. अनेकांना वाटतय की, आपण भाजपासोबत जावं, काहीजण निर्णय घेत आहेत. मोठ्या प्रमाणात भाजपासोबत मोदीजींसोबत जाव अशी भावना सर्वपक्षीय नेत्यांमध्ये पहायला मिळतेय” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्...
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्....
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक.
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले.
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष.
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल.