दिलीप गांधींच्या भेटीवर विखे पाटलांनी अखेर मौन सोडलं!

दिलीप गांधींच्या भेटीवर विखे पाटलांनी अखेर मौन सोडलं!


अहमदनगर : अहमदनगरला काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तर या भेटीने नगरमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विखेंचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार आहेत. तिकीट कापल्यामुळे नाराज असेलेल्या दिलीप गांधींची राधाकृष्ण विखेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.

विखे पाटील काय म्हणाले?

बरेच दिवस भेटलो नव्हतो म्हणून ही सदिच्छा भेट असल्याचे विखे पाटलांनी सांगितलाय. तर हे घर माझंच असून आमचा जुना स्नेह असल्याचे विखे म्हणाले. तसेच राजकारणची चर्चा झाली नसल्याचा दावा विखेंनी केला. मी राष्ट्रवादीचे काम करणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

आहेर नको, सुजयला मत द्या, नगरमधील शेख कुटुंबाचं लग्नपत्रिकेतून आवाहन

दिलीप गांधी काय म्हणाले?

मात्र दुसरीकडे खासदार दिलीप गांधी यांनी ही भेट राजकीय असल्याचे स्पष्ट केलंय. तसेच अम्ही वर्षनुवर्षे आम्ही काम केलंय तर विखेंच चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपाचे उमेदवार आहेत. त्या अनुषंगाने अनेक चर्चा झालाचे गांधी यांनी सांगितले. त्याचबरोबर मी भाजपचाच प्रचार करणार असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केलंय. तर गांधींची नाराजी दूर करण्यात विखेंना यश आल्याचं देखील बोललं जातंय.

राधाकृष्ण विखे पाटील खासदार दिलीप गांधींच्या भेटीला

दिलीप गांधींची नाराजी दूर करण्यासाठी विखे-गांधी भेट?

राधाकृष्ण विखेंची ही भेटही नाराजी दूर करण्यासाठीच तर नव्हती ना, असाही प्रश्न उपस्थित होतो. कारण, राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलासाठी विविध ठिकाणी बैठका सुरु केल्या असल्याचंही बोललं जातंय.

नातं मध्ये येणार नाही, कोणत्याही परिस्थितीत सुजयचाच विजय : शिवाजी कर्डिले

राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या काँग्रेसमध्येच असले तरी आपण आघाडीच्या उमेदवाराचा नगरमध्ये प्रचार करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीने काँग्रेसला नगरची जागा न सोडल्याने सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीने विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI