सलग नऊ वेळा खासदार राहिलेल्या काँग्रेस नेत्याच्या मुलाचंही बंड

नंदुरबार : बंडखोरीमुळे राज्यात काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. सांगली, हातकणंगले आणि त्यानंतर आता नंदुरबारमध्येही काँग्रेसची मोठी अडचण निर्माण झाली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस हे एक समीकरण होतं. माणिकराव गावित सलग 9 वेळा या मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार म्हणून विजयी झाले. पण त्यांच्या कुटुंबाला डावलण्यात आल्यामुळे मुलाने आता बंडखोरीचा इशारा दिलाय. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये […]

सलग नऊ वेळा खासदार राहिलेल्या काँग्रेस नेत्याच्या मुलाचंही बंड
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

नंदुरबार : बंडखोरीमुळे राज्यात काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. सांगली, हातकणंगले आणि त्यानंतर आता नंदुरबारमध्येही काँग्रेसची मोठी अडचण निर्माण झाली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस हे एक समीकरण होतं. माणिकराव गावित सलग 9 वेळा या मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार म्हणून विजयी झाले. पण त्यांच्या कुटुंबाला डावलण्यात आल्यामुळे मुलाने आता बंडखोरीचा इशारा दिलाय.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पराभव पत्करावा लागला. आता या जेष्ठ काँग्रेस नेत्याच्या मुलाने काँग्रेसच्या विरोधात दंड थोपटत उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी करण्याचा तयारी केली आहे. त्यासाठी भरत गावित यांनी 30 मार्च रोजी नवापूर येथे मतं जाणून घेण्यासाठी आपल्या समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यात ते आपली पुढील रणनीती ठरवणार आहेत.

या मेळाव्यामध्ये भरत गावित भूमिका जाहीर करणार आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यास काँग्रेसचे उमेदवार के. सी. पाडवी यांच्या बरोबरच भाजपाच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांना देखील मोठं आव्हान उभं राहणार आहे.

52 वर्षे खासदारकी करत असताना माणिकराव गावित यांनी निभावलेली पक्षनिष्ठा आणि सर्व घटकांशी प्रेमभाव जपून मतदारसंघाशी बांधलेली घट्ट नाळ लक्षात घेता त्यांचे समर्थन करणारा भलामोठा कार्यकर्ता वर्ग आहे. पक्षाने माणिकराव गावित यांच्याऐवजी भरत गावित यांना उमेदवारी देऊन त्यांच्या या निष्ठेला आणि कार्याला न्याय दिला पाहिजे होता, अशी भावना या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

भरत गावित यांना उमेदवारी नाकारल्यामुळे अन्याय झाल्याची भावना बनलेला हा समर्थकांचा समूह भरत गावित यांना अपक्ष उमेदवारी करण्याचा आग्रह करत आहे. परिणामी काँग्रेसचे जाहीर झालेले उमेदवार के. सी. पाडवी यांची एक मोठी फळी विभागली जाईल हे स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे भाजपाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि खासदार हिना गावित यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले आणि आतून खिंडार पाडायला उत्सुक असलेले कार्यकर्ते सुद्धा भरत गावित यांच्या अपक्ष उमेदवारीला मजबूत करणार आहेत.

30 तारखेच्या मेळाव्यानंतर या अपक्ष उमेदवारीबद्दलचं चित्र स्पष्ट होईल. तूर्तास महाराष्ट्रात जागोजागी काँग्रेसला खिंडार पडत असतानाच नंदुरबार जिल्ह्यातही हेच चित्र निर्माण झालंय.

भरत गावित यांच्या परिवाराचा काँग्रेसमधील प्रवास

वडील : माणिकराव होडल्या गावित सलग 9 वेळा नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे खासदार

दोन वेळा केंद्रात राज्यमंत्री, लोकसभेचे हंगामी अध्यक्ष

बहीण : निर्मला गावित आमदार, इगतपुरी

भरत गावित जिल्हा परिषद सदस्य आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे अडीच वर्ष अध्यक्ष

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.