AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पटोले म्हणतात, नोव्हेंबरपासून निवडणुका, तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जातील !

नाना पटोले आज दिवसभरात चर्चेत आहेत. त्याची दोन कारणं आहेत. पहिलं, त्यांनी काल अकोल्यात केलेलं वक्तव्य आणि आज पुन्हा अमरावतीत केलेलं वक्तव्य. दोन वक्तव्यांमुळे नाना पटोलेंची जोरदार चर्चा होते आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांकडून अशी वक्तव्य महाराष्ट्राला ऐकायची सवय नाही, तशी आक्रमता नाना पटोले दाखवत असल्याचं जाणकारांना वाटतं.

पटोले म्हणतात, नोव्हेंबरपासून निवडणुका, तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जातील !
NANA PATOLE
| Edited By: | Updated on: Jun 13, 2021 | 10:50 PM
Share

मुंबई : नाना पटोले ( Nana Patole) आज दिवसभरात चर्चेत आहेत. त्याची दोन कारणं आहेत. पहिलं, त्यांनी काल अकोल्यात केलेलं वक्तव्य आणि आज पुन्हा अमरावतीत केलेलं वक्तव्य. दोन वक्तव्यांमुळे नाना पटोलेंची जोरदार चर्चा होते आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांकडून अशी वक्तव्य महाराष्ट्राला ऐकायची सवय नाही, तशी आक्रमता नाना पटोले दाखवत असल्याचं जाणकारांना वाटतं. (Congress Maharashtra president Nana Patole said next election will be in November month  appreciated Yashomati Thakur)

तर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जातील !

नाना पटोले हे विदर्भातल्या काही दौऱ्यांच्या जिल्ह्यावर आहेत. आज ते अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा मतदारसंघात होते. मंत्री यशोमती ठाकूर ह्या तिवसा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. नाना पटोले हे आगामी निवडणुकांसाठीची काँग्रेसची मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाचं कौतूक करताना पटोले म्हणाले की, तुम्हाला मी विधानसभेत गेली अनेक वर्ष पहातोय. ह्या भागाच्या लोकांसाठी सातत्यानं भांडणारी रणरागिनी आम्ही पाहिली. वेळ आली तर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जायला मागे पुढे पहात नाही. जे लीड आपल्याला मिळालं, त्यापेक्षा जास्त मतानं आपला उमेदवार ह्या भागातून निवडुण यायला पाहिजे.

2024 ला ग्रामगीतेच्या आधारावर सरकार चालवू

याच कार्यक्रमात नाना पटोले यांनी नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात निवडणुकाच निवडणूका असल्याचं जाहीर केलं. त्यासाठी काँग्रेस नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तयारी करावी असं सांगायलाही पटोले विसरले नाहीत. विशेष म्हणजे मंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवश्याला काँग्रेसचं संघटनात्मक मॉडेल म्हणून तयार करावं, जे संपूर्ण महाराष्ट्रात राबवता येईल अशी अपेक्षाही पटोले यांनी संबोधनात व्यक्त केली. सर्वात महत्वाचं म्हणजे 2024 साली ग्रामगीतेच्या आधारावर सरकार चालवू अशी घोषणाही पटोलेंनी केली आहे. ग्रामगीता हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा महान ग्रंथ मानला जातो.

पाहा व्हिडीओ :

जेव्हा नानांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा जाहीर केली

नाना पटोले काल अकोल्यात होते. तिथं त्यांनी एका सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. आधीच आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन घमासान सुरु आहे. त्यात नानांनी इच्छा बोलून दाखवल्यानंतर आघाडीच्या राजकारणात चर्चेला ऊतच आला. त्याही कारणामुळे नाना पटोले कालपासून चर्चेत आहेत. नाना पटोलेंची ही आक्रमकता प्रत्यक्षात काँग्रेसला किती यश देते हे पहाणेही तेवढंच महत्वाचं आहे. कारण नानांच्या महत्वाकांक्षेची राष्ट्रवादी काँग्रेसनं खिल्ली उडवलीय तर त्यांचेच विदर्भातले सहकारी विजय वडेट्टीवार यांनी मिश्किलपणे शुभेच्छा दिल्यात.

इतर बातम्या :

नाना पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचंय? विजय वडेट्टीवार काय म्हणाले? राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला काय वाटतं?

“प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी”

राष्ट्रवादीसोबतही मुख्यमंत्रीपदावरुन सेनेचा ‘शब्द’ देण्याचा वाद? राऊतांचं नाशकातही रोखठोक ‘5 वर्ष’

(Congress Maharashtra president Nana Patole said next election will be in November month  appreciated Yashomati Thakur)

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.