LIVE : शेतकऱ्यांसाठी वेगळा बजेट मांडणार – राहुल गांधी

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections 2019) काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे : 1) न्याय योजना – हिंदुस्थानी जनतेच्या खात्यात सरकार किती रक्कम टाकू शकतो? य़ाची […]

LIVE : शेतकऱ्यांसाठी वेगळा बजेट मांडणार - राहुल गांधी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections 2019) काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे :

1) न्याय योजना – हिंदुस्थानी जनतेच्या खात्यात सरकार किती रक्कम टाकू शकतो? य़ाची मी माहिती घेतली. गरिबीवर वार, 72 हजार, राहुल गांधींची घोषणा, काँग्रेस न्याय योजना आणणार

2) रोजगार – मोदींनी 2 कोटी रोजगाराचं खोटं आश्वासन दिलं.. मी माझ्या समितीला विचारलं सत्य काय आहे? तर आम्ही 22 लाख रोजगार देऊ. 10 लाख तरुणांना ग्रामपंचायतीत रोजगार उपलब्ध करुन देऊ, तरुणांना उद्योगांसाठी तीन वर्षांसाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही. बँकांचे दरवाजे खुले असतील – राहुल गांधी

3) शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट – राहुल गांधींनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट असेल असं आश्वासन दिलं. जसं रेल्वेसाठी स्वतंत्र बजेट असतं, तसंच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट असेल, असं राहुल गांधींनी सांगितलं. जर शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं नाही तर त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही

4) शिक्षण आणि आरोग्य – दरडोई उत्पन्नाच्या अर्थात जीडीपीच्या 6 टक्के खर्च शिक्षणावर करण्याची घोषणा राहुल गांधींनी केली. आरोग्याबाबत राहुल म्हणाले, आमचा खासगी विमान कंपन्यांवर विश्वास नाही. गरिबांनाही चांगल्या दर्जाच्या रुग्णालयात उपचार मिळतील.

LIVE UPDATE :

  • भ्रष्टाचार, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर नरेंद्र मोदींनी थेट माझ्यांशी चर्चा करुन दाखवावी – राहुल गांधी
  • बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या हे मुद्दे देशातील वास्तव आहेत – राहुल गांधी
  • काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जनतेच्या ‘मन की बात’ – राहुल गांधी
  • जीडीपीच्या 6 टक्के पैसा शिक्षण क्षेत्रासाठी खर्च करु – राहुल गांधी
  • काँग्रेस पार्टी मार्च 2020 पर्यंत देशातील सरकारी खात्यात 22 लाख नोकऱ्या देणार, 10 लाख युवांना ग्रामपंचायतीत नोकऱ्या देणार – राहुल गांधी
  • शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प असायला हवा – राहुल गांधी
  • 10 लाख ग्रामपंचायतीत आणि 22 लाख विविध खात्यात रोजगार उपलब्ध होऊ शकतो – राहुल गांधी
  • शेतकरी आणि रोजगार हे काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे – राहुल गांधी
  • जाहीरनाम्यातील एकही शब्द खोटा नाही – राहुल गांधी
  • काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पाच महत्त्वाच्या गोष्टी, सर्वात पहिली ‘न्याय’ योजना – राहुल गांधी
  • आमच्या जाहीरनाम्याचं काम उत्तमपणे झालंय, संपूर्ण टीमचे अभिनंदन – राहुल गांधी
  • काँग्रेसचा जनआवाज जाहीरनामा प्रसिद्ध, ‘हम निभाएंगे’ असं जाहीरनाम्यांच्या मुखपृष्ठावर आश्वासन

  • माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं भाषण सुरु
  • देशातील 121 ठिकाणी भेटी देऊन काँग्रेसच्या जाहीरनाम्याची निर्मिती
  • काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 19 आश्वासनं – सूत्र
  • थोड्याच वेळात काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार, पी. चिदंबरम लाईव्ह
  • जनआवाज असे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे नाव
  • काँग्रेसचा जाहीरनामा थोड्याच वेळात प्रसिद्ध होणार, पत्रकार परिषदेची सर्व तयारी पूर्ण, नेतेही पोहोचले

  • काँग्रेसचे वरिष्ठ नेते पोहोचले
  • राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी पोहोचल्या
  • राहुल गांधी जाहीरनामा प्रसिद्ध करणार

निवडणुकीच्या तारखा जाहीर :

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.