AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कालिदास कोळंबकरांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजप प्रवेशाची तारीख ठरली

वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच उद्या मंगळवारी (30 जुलै) ते विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत.

कालिदास कोळंबकरांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजप प्रवेशाची तारीख ठरली
| Updated on: Jul 29, 2019 | 1:39 PM
Share

मुंबई : नारायण राणेंचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज (29 जुलै) काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोळंबकरांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. यानंतर बुधवारी 31 जुलैला कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोललं जात होते. गेल्या साडेचार वर्षात काँग्रेस पक्षाने माझ्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यात न्याय दिला नाही. त्यामुळेच मी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची भावना कालिदास कोळंबकरांनी याआधीच व्यक्त केली होती.

“माझी कामं मुख्यमंत्र्यानी केली आहेत, त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी आहे. फक्त नायगावमधील पोलिसांचा प्रश्न सुटला की मी भाजपमध्ये प्रवेश करेन, असं कालिदास कोळंबकर यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं होतं. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या या अटी मान्य केल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे आधीच काँग्रेसला फटका बसत आहे. त्यातच आता वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच उद्या मंगळवारी (30 जुलै) ते विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. यानंतर येत्या बुधवारी म्हणजे 31 जुलैला कोळंबकर भाजपात प्रवेश करणार आहेत.

कालिदास कोळंबकर कोण आहेत?

  • कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत.
  • सलग सातवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.
  • नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून कोळंबकर यांची ओळख आहे.
  • नारायण राणेंसोबत त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
  • राणेंसोबत आलेले सर्व आमदार शिवसेनेत परतले, मात्र केवळ कालिदास कोळंबकर हे काँग्रेसमध्येच राहिले. आता कालिदास कोळंबकर काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार आहेत.

संबंधित बातम्या :

मी भाजपमध्ये प्रवेश करणार, पण एकच अट…: आमदार कालिदास कोळंबकर

राणेंनी शिवसेनेतून सोबत नेलेल्या 10 पैकी सध्या फक्त एकाची साथ

फडणवीस सांगतील त्या पक्षात जाईन, मुंबईतील काँग्रेस आमदाराची घोषणा

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या