पुण्यात उमेदवाराविनाच काँग्रेस आघाडीची प्रचाराला सुरुवात

पुणे : लोकसभा निवडणुका अवघ्या काहीच दिवसांवर आल्या आहेत. अनेक जागांवर वेगवेगळ्या पक्षांनी त्यांचे उमेदवारही जाहीर केले आहेत. सध्या सर्वच राजकीय पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. उमेदवाराच्या मतदारसंघात जाऊन पक्षाचे बडे नेते सभा घेत आहेत. मात्र, पुण्यात काँग्रेस आघाडीने उमेदवाराविनाच प्रचाराला सुरुवात केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीने अजूनही उमेदवार जाहीर केलेला …

पुण्यात उमेदवाराविनाच काँग्रेस आघाडीची प्रचाराला सुरुवात

पुणे : लोकसभा निवडणुका अवघ्या काहीच दिवसांवर आल्या आहेत. अनेक जागांवर वेगवेगळ्या पक्षांनी त्यांचे उमेदवारही जाहीर केले आहेत. सध्या सर्वच राजकीय पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. उमेदवाराच्या मतदारसंघात जाऊन पक्षाचे बडे नेते सभा घेत आहेत. मात्र, पुण्यात काँग्रेस आघाडीने उमेदवाराविनाच प्रचाराला सुरुवात केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीने अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना उमेदवार जाहीर न झाल्याने प्रचाराला उशीर होत आहे. म्हणून उमेदवाराविनाच काँग्रेस आघाडीने प्रचाराला सुरुवात केली. आज कसबा गणपतीला नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. मात्र, नेमका प्रचार कुणाचा करायचा याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीने बहुतेक जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर पक्षांच्या प्रचारालाही सुरुवात झाली. मात्र, आघाडीचा पुणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम आहे. पुण्याहून युतीने पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, आघाडीने अद्यापही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. आघाडीकडून पुण्याच्या जागेसाठी माजी आमदार मोहन जोशी, महापालिका गटनेते अरविंद शिंदे आणि संभाजी ब्रिगेडमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रविण गायकवाड यांची नावं चर्चेत आहेत.

या तिघांपैकी माजी आमदार मोहन जोशी यांचं नाव मागे पडलं आहे. मात्र, अरविंद शिंदे आणि प्रविण गायकवाड यांच्यापैकी कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत आघाडी अद्याप निर्णय घेऊ शकलेली नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच प्रचाराला उशीर होत असल्याने कार्यकर्त्यांनी कसबा गणपतीला नारळ फोडून प्रचाराचा श्रीगणेश केला. उमेदवाराविनाच प्रचाराला सुरुवात व्हावी, असे  राज्यातच नाही तर संपूर्ण देशात पहिल्यांदाच होत आहे. आघाडीच्या या प्रचार पद्धतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. आता आघाडी उमेदवार कधी घोषित करणार आणि पुण्याच्या जागेहून कोण निवडणूक लढवणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचंच नाही तर सर्व रायकीय पक्षांचं लक्ष लागून आहे.

VIDEO : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *