AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई जिंकण्यासाठी तयारीला लागली काँग्रेस, वाचा सविस्तर प्लॅन काय आहे?

काँग्रेसकडून मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पदयात्रा आणि चौकसभा घेण्याचा प्लॅन आहे. Congress Mumbai Municipal Corporation elections

मुंबई जिंकण्यासाठी तयारीला लागली काँग्रेस, वाचा सविस्तर प्लॅन काय आहे?
भाई जगताप
| Updated on: Feb 05, 2021 | 2:38 PM
Share

मुंबई: मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करुन काँग्रेस पक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं चित्र आहे. महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी असली तरी काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. काँग्रेसकडून मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पदयात्रा आणि चौकसभा घेण्याचा प्लॅन आहे. (Congress prepares for win Mumbai Municipal Corporation elections)

सायनमध्ये पहिली पदयात्रा

मुंबई महापालिकेत सध्या मुंबई विरोधी पक्षात आहेत. काँग्रेसचे रवि राजा विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत आहेत. भाई जगताप यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केल होते. त्याप्रमाणे सायनमध्ये काँग्रेसची पहिली पदयात्रा होणार असून त्यानंतर चौकसभा देखील घेण्यात येईल. पदयात्रेची सुरुवात सायनमधून होईल. तिथून पुढे कोळीवाडा-शुक्ला हॉटेल- कोकरी आगार- शेख मिस्त्री दर्गा- भरणी नाका- मार्गे दिनबंधूनगरमध्ये समारोप होईल.

पदयात्रेच्या उद्घाटनाला दिग्गज नेते उपस्थित राहणार

मुंबई काँग्रेसची मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. प्रत्येक लोकसभा मतदार संघात मुंबई काँग्रेस करणार पदयात्रा आणि एक चौकसभा होईल. सायन मध्ये उदया पहिली पदयात्रा आणि सभा होईल.महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप उपस्थित आहेत.

227 वार्डमध्ये पदयात्रांचे आयोजन

मुंबई काँग्रेसकडून महापालिका क्षेत्रातील सर्व वार्डमध्ये पदयात्रा काढण्यात येणार आहे. याद्वारे मुंबईतील विविध विषय जनतेसमोर मांडले जाणार आहेत. मुंबईला 24 तास पाणी पुरवठा, 500 फूट घर सरसकट मालमत्ता कर माफी, स्थानिक प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेत कुणाकडे कुठली जबाबदारी?

भाई जगताप – मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याकडे सदस्य नोंदणी अभियान राबवणे, मुंबई काँग्रेसचे सर्व फ्रंट, विभाग, सेलचं पुढील 45 दिवसांत पुनर्गठन करणं, सार्वजनिक सभा करण्यापासून 100 दिवसांत 100 किलोमीटरपर्यंत पदयात्रा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नसीम खान – निवडणूक अभियान समितीचे प्रमुख नसीम खान यांच्याकडे 15 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रचार उपसमितीची निर्मिती, त्यातील सदस्यांची निवड करण्यापासून अजेंडा ठरवण्याचं काम देण्यात आलं आहे.

अमरजीत सिंह मनहास – ई काँग्रेस समन्वय समितीचे प्रमुख अमरजीत सिंह मनहास यांच्याकडे मुंबई काँग्रेस, महाराष्ट्र काँग्रेस, राज्य सरकारमधील मंत्री आणि मुंबई महापालिकेत समन्वय राखण्याची जबाबादारी दिली आहे.

सुरेश शेट्टी – निवडणूक घोषणा पत्र आणि प्रचार समिती प्रमुख सुरेश शेट्टी यांच्याकडे काँग्रेसचं काम लोकांपर्यंत पोहोचवणं, भाजपच्या उणिवा शोधणं, राज्य सरकारनं राबवलेल्या जनहिताच्या योजना समोर आणणं, मुंबईच्या विकासातील मुंबई काँग्रेसचं योगदान, मुंबई काँग्रेसचा प्रचार अशा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

सर्व पदाधिकारी – सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभागांमध्ये उपसमितीचा दौरा करण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच सर्व 227 वॉर्डात पक्षाला मजबूत करण्यासाठी ताळमेळ राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

शिवसेनेला मुंबईत जशास तशी टक्कर देण्याची काँग्रेसची तयारी! भाई जगतापांच्या हाती कोणती सूत्रं?

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीतही निष्ठावान Vs आयाराम गयाराम?

(Congress prepares for win Mumbai Municipal Corporation elections)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.