AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तामिळनाडूत पडद्यामागे मोठ्या हालचाली, एका पत्राने राजकारणात उलथापालथ; काँग्रेसच्या थेट निर्णयाने गणित बदललं!

अभिनेता थलापती विजय यांचा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने एकूण 108 जागा जिंकल्या आहेत. परंतु येथे कोणत्याही एका पक्षाला तेथे बहुमताचा 118 हा जादुई आकडा गाठता आलेला नाही.

तामिळनाडूत पडद्यामागे मोठ्या हालचाली, एका पत्राने राजकारणात उलथापालथ; काँग्रेसच्या थेट निर्णयाने गणित बदललं!
actor vijay thalapathy and rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 06, 2026 | 1:57 PM
Share

Tamilnadu Government Formation : लातामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल गल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे अभिनेता थलापती विजय यांचा टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने एकूण 108 जागा जिंकल्या आहेत. परंतु येथे कोणत्याही एका पक्षाला तेथे बहुमताचा 118 हा जादुई आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे टीव्हीके हा पक्ष अन्य पक्षांकडून पाठिंबा मागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. असे असतानाच आता राजकीय गोटातून मोठी माहिती समोर आली आहे. येथे काँग्रेसने थेट सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेस टीव्हीके पक्षाला पाठिंबा देणार आहे.

नेमकं काय घडतंय?

तामिळनाडूत डीएमके आणिक काँग्रेस यांची अगोदरपासूनच युती आहे. या दोन्ही पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. येथे काँग्रेसने एकूण पाच जागांवर विजय मिळवला आहे. निवडणूक झाल्यानंतर मात्र आता काँग्रेस टीव्हीके पक्षाला पाठिंबा देणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच तामिळनाडूत काँग्रेस सत्तेत सहभागी होणार आहे. विजय थलापती यांचा पक्ष सर्वात मोठा ठरल्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लगेच त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर काँग्रेस टीव्हीकेला पाठिंबा देऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. आता हीच शक्यता खरी ठरली आहे.

काँग्रेसने ठेवली एक अट

काँग्रेसकडे पाच आमदार आहेत. काँग्रसने हा पाठिंबा देताना टीव्हीके पक्षापुढे एक अट समोर ठेवली आहे. आम्ही टीव्हीके पक्षाला पाठिंबा देऊ परंतु संविधानावर विश्वास नसलेल्या कोणत्याही जातीयवादी पक्षाला टीव्हीकेने भविष्यात या आघाडीत घेऊ नये, अशी काँग्रेसची अट आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि टीव्हीकेची ही युती फक्त विधानसभेपुरतीच मर्यादित नसणार आहे. आगामी काळात होणारी लोकसभा निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक असेल या सर्वच निवडणुकीत टीव्हीके आणि काँग्रेसची आघाडी असेल.

दरम्यान, याआधी तामिळनाडूत सत्तेत सहभागी व्हावे असे थलापती विजय यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर काँग्रेसने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त