Congress: एक व्यक्ती, एक पद ते भारत जोडो अभियान, काँग्रेसचे उदयपूर शिबिरीतील 8 ‘नव संकल्प’

| Updated on: May 31, 2022 | 6:43 PM

Congress: काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कोमत्याही व्यक्तीला केवळ एकच पद दिलं जाईल. तसेच कुटुंबातील एकाच व्यक्तीला निवडणुकीचं तिकीट दिलं जाणार आहे.

Congress: एक व्यक्ती, एक पद ते भारत जोडो अभियान, काँग्रेसचे उदयपूर शिबिरीतील 8 नव संकल्प
एक व्यक्ती, एक पद ते भारत जोडो अभियान, काँग्रेसचे उदयपूर शिबिरीतील 8 'नव संकल्प'
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

उदयपूर: राजस्थानच्या उदयपूरमध्ये काँग्रेसचं (Congress) तीन दिवसाचं नव संकल्प शिबीर पार पडलं. या शिबिरात काँग्रेसच्या पडझडीवर चिंता करण्यात आली. काँग्रेस पदाधिकारी, नेत्यांचं पक्षाला सोडून जाण्यापासून ते प्रत्येक निवडणुकीत होत असलेल्या पराभवावर चिंतन करण्यात आलं. यावेळी पक्षवाढीसाठी चर्चाही करण्यात आली. देशभरातून आलेल्या काँग्रेस नेत्यांच्या भूमिका आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. त्यानंतर पक्ष वाढीसाठी काही निर्णय घेण्यात आले. त्यावर शिक्कामोर्तबही करण्यात आलं. तसेच कार्यकर्त्यांच्या हाती संघटनवाढीचा अजेंडाही देण्यात आला. यावेळी भाजपवरही (bjp) घणाघाती हल्ला करण्यात आला. भाजप देशात द्वेष निर्माण करत आहे. समाज तोडण्याचं काम करत आहे. त्यांच्या विरोधात लढलं पाहिजे, असं काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांनी सांगितलं. काँग्रेसच्या या तीन दिवसीय शिबिरात मांडण्यात आलेल्या ठरावांचा घेतलेला हा आढावा.

एक व्यक्ती एक पद, कुटुंबातील एकालाच पद

काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कोणत्याही व्यक्तीला केवळ एकच पद दिलं जाईल. तसेच कुटुंबातील एकाच व्यक्तीला निवडणुकीचं तिकीट दिलं जाणार आहे. काँग्रेससाठी पाच वर्ष काम केलं तरच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तिला तिकीट देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

प्रत्येकाचा कार्यकाळ फक्त पाच वर्षाचा

यावेळी पक्षातील प्रत्येक पदाचा कार्यकाळ पाच वर्ष इतकाच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही पदाधिकाऱ्याला पाच वर्षापेक्षा अधिक काळ देता येणार नाही. पाच वर्षानंतर त्याला पद खाली करावे लागेल. कारण इतरांनाही संधी मिळायला हवी, असं या बैठकीत ठरलं आहे.

50 टक्के कार्यकर्त्यांचं वय 50 वर्षापेक्षा कमी असावं

काँग्रेसमध्ये तरुणांची संख्या वाढवण्यासाठी प्रत्येक संघटनात्मक स्तरावर ज्या लोकांचं वय 50 पेक्षा कमी आहे, त्यांना संधी दिली जाणार आहे.

रोजगार द्या पदयात्रा

काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत 15 ऑगस्टपासून रोजगार द्या पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते अजय माकन यांनी दिली.

भारत जोडो अभियान

भाजप सरकारने समाजासमाजात तेढ निर्माण केली आहे. देशात द्वेषाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे येत्या 2 ऑक्टोबरपासून म्हणजे गांधी जयंतीपासून देशात भारत जोडो अभियान सुरु करण्यात येणार आहे. स्वत: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही माहिती दिली आहे.

तात्काळ नियुक्त्या आणि तीन विभाग

येत्या 90 ते 180 दिवसात जिल्हास्तरांवरील नियुक्त्या करण्यात येणार आहेत. तसेच सर्वांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या मंडल कमिट्याही स्थापन केल्या जाणार आहेत. त्याशिवाय तीन विभाग केले जाणार आहे. एक पब्लिक इन्साईट डिपार्टमेंट असेल. यात जनतेचे विचार ऐकले जातील. दुसरा विभाग हा इलेक्शन मॅनेजमेंटचा असेल. हा विभाग निवडणुकांच्या तयारीचं काम करेल. तिसरा विभाग हा नॅशनल ट्रेनिंग विभाग असेल. या विभागात पक्ष कार्यकर्त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल, अशी माहिती अजय माकन यांनी दिली.

जातीनिहाय जनगणनेची मागणी

मजूरांच्या सशक्तीकरणावरही काँग्रेस भर देणार आहे. प्रत्येक वर्गाच्या महिलांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं पाहिजे. एससी, एसटी आणि अल्पसंख्याक समुदायांच्या प्रश्नावरही आवाज उठवण्यात येणार आहे. नवी शिक्षण धोरणावर चर्चा व्हावी, नव्या शैक्षणिक धोरणात गरीब आणि श्रीमंतांमध्ये दरी निर्माण केली जात आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना केली जावी. ही जनगणना केल्यानंतर आकडे येतील. त्यानुसार वंचितांना त्यांचे अधिकार दिले जातील.

सहा समूह, 430 नेते

विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सहा वेगवेगळ्या टीम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकारण, समाजिक न्याय आणि सशक्तीकरण, अर्थव्यवस्था, संघटना, शेतकरी, कृषी आणि तरुण वर्ग आदी मुद्द्यांचा समावेस आहे. या समुहात 430 नेत्यांनी या मुद्द्यांवर चर्चा केली.