AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी मुंबईत घोषणा, आता नवी मुंबईत एल्गार, काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नवी मुंबईत काँग्रेस भवनाचे उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा दिला.

आधी मुंबईत घोषणा, आता नवी मुंबईत एल्गार, काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढणार
नाना पटोले
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 1:38 PM
Share

हर्षल भदाणे पाटील, नवी मुंबई : मुंबईपाठोपाठ नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Election) निवडणूकही स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने (Congress) केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नवी मुंबईत काँग्रेस भवनाचे उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा दिला. “अंतर्गत मतभेद मिटवता आले नाहीत तर दुसऱ्याला संधी दिली जाईल. पक्ष एकट्याचा नसतो तर त्याची विचारधारा मानणाऱ्या सर्वांचा असतो”, अशा कानपिचक्या नवी मुंबई काँग्रेसला महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या. यावेळी कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार मोहन जोशी, नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक , संतोष शेट्टी इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर गरिबांना शिधा वाटप करण्यात आले. (Congress will contest Navi Mumbai municipal Election independently announce Congress Maharashtra president Nana Patole )

नवी मुंबई काँग्रेस ही कायम सत्ताधारी पार्टीबरोबर फरफटत चालते असा नेहमीच आरोप केला जातो. काही वर्षांपूर्वी राजकीय अज्ञातवासात गेलेले अनिल कौशिक (Anil Kaushik) यांना पुन्हा संधी देत काँग्रेस अध्यक्ष बनवण्यात आले. त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस पहिल्यांदा मनपाच्या सत्तेत आली होती. मात्र सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जात असून, काही दिवसापूर्वी अचानक चार प्रवक्त्यांना काढण्यात आले होते.

काँग्रेस भवनच्या (Congress Bhawan navi Mumbai) नूतनीकरण उद्धाटन कार्यक्रमात या सर्व घटनांचे पडसाद दिसून येत होते. पटोले यांनी आपल्या भाषणात आणि पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तरे देताना नवी मुंबई काँग्रेसबाबत नाराजीचा सुरु दिसून आल्याची चर्चा होत होती.

निवडणुकीत रिझल्ट द्या

पटोले म्हणाले, “प्रदेशाध्यक्ष म्हणून केंद्रीय नेतृत्वाकडे अहवाल पाठवावा लागतो. मात्र मी चार महिन्यात अहवाल पाठवला नाही. शहरात विविध कार्यक्रम घेतले जातात, त्याचे फोटो काढून अहवाल तयार केले जातात. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत रिझल्ट दिसत नाही. त्यामुळे निवडणुकीत तुमच्या कामांचा रिझल्ट दिसणे गरजेचे आहे.

तर नवी मुंबई अध्यक्षही बदलू

नवी मुंबईत काँग्रेस अंतर्गत वाद मिटवावे आणि ते मिटवता येत नसेल तर दुसऱ्याला संधी दिली जाईल असा इशारा त्यांनी दिलाय. इतकंच नाही तर नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक यांच्यापेक्षा चांगला व्यक्ती भेटला तर त्याला संधी देण्यात येईल, असंही नाना पटोले म्हणाले.

लोकांची कामे करा कोणाच्या घरात दुःखद घटना घडली तर त्याच्या घरी जाऊन भेट घ्या, सांत्वन करा. नवी मुंबई हे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या कल्पनेतून उतरली असून त्यांच्या तो उद्देश्य साध्य करण्यासाठी काँग्रेस सत्तेत असणे गरजेचे आहे असं नाना पटोलेंनी सांगितलं.

नाना पटोले यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्वाचे मुद्दे

आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण वाद – दिवा पाटील आणि बाळासाहेब ठाकरे दोन्ही आमच्यासाठी आदरणीय व्यक्ती आहेत. दोघांचाही सन्मान राहणे गरजेचे आहे नावासमंधी वाद होणार नाही असा निर्णय घेत मध्यम मार्ग घेण्यात येईल

१०२ घटना दुरुस्ती नंतर मराठा आरक्षण बाबत राज्याला अधिकार राहिला नाही. तरीही विद्यमान विरोधी पक्ष नेता दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे वेगळा काही आयोग बसवण्याचे कारण नाही.

पेट्रोल डिझेल दरवाढ अयोग्य आहेत, अनेक करांतून पैसा केंद्र सरकारकडे जातो. गोळवलकर गुरुजींनी एक पुस्तक लिहले आहे त्यात लोकांना रांगेत उभे ठेवा त्यांच्या हातात भिकेचा कटोरा ठेवा लिहले आहे. तसेच सरकार चालत आहे. गरिबातील गरीब माणसाकडून वर्षाला कमीत कमीत २४ हजार रुपये काढले जातात त्याला २ हजार मदत म्हणून रुपये दिले जातात.

संबंधित बातम्या

BMC Election 2022 : तयारीला लागा, मुंबई मनपाची निवडणूक ठरल्या वेळेतच होण्याची चिन्हं, वॉर्ड पुनर्रचनेचे आदेश 

Special Report | मुंबई मनपा निवडणुकीवरून शिवसेना-भाजप आमनेसामने 

(Congress will contest Navi Mumbai municipal Election independently announce Congress Maharashtra president Nana Patole )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.