AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: गटनेता, प्रतोद का महत्वाचा? ठाकरे की भाजप-शिंदेंचं सरकार कसं शक्य आहे? घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राजकिय पेच निर्माण झालायं. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे 40 आमदार असल्याचा दावा केला. भाजपाचे आमदार आणि एकनाथ शिंदेंसोबत असलेले 37 आमदार मिळून सत्तास्थापन करू शकतात, असेही उल्हास बापट म्हणाले आहेत. यानुसार देवेंद्र फडणवीस यांना उरलेले अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहाता येईल.

Eknath Shinde: गटनेता, प्रतोद का महत्वाचा? ठाकरे की भाजप-शिंदेंचं सरकार कसं शक्य आहे? घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 22, 2022 | 1:26 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता राज्यात सत्तास्थापन करण्याच्या हालचालींमध्ये वाढ झालीये. एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा असेल तर महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतांमध्ये आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी गटनेता पद वैध नसल्याचे म्हटंले आहे. मात्र, यासंदर्भात घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी महत्वाची माहिती सांगितली. उल्हास बापट म्हणाले की, गटनेते पदाची जी निवड (Selection) करण्यात आलीये, ती योग्य आणि वैध आहे, कारण एकनाथ शिंदेंकडे जरी आता बहुमताचा आकडा असेल तरीही तो अजून सिध्द झालेला नाहीये.

घटनाकार उल्हास बापट म्हणाले

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राजकिय पेच निर्माण झालायं.  शिंदे यांनी त्यांच्याकडे 40 आमदार असल्याचा दावा केला. भाजपाचे आमदार आणि एकनाथ शिंदेंसोबत असलेले 37 आमदार मिळून सत्तास्थापन करू शकतात, असेही उल्हास बापट म्हणाले आहेत. यानुसार देवेंद्र फडणवीस यांना उरलेले अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहता येईल. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील. भाजपाने देखील आपल्या आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिलेत.

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राजकिय पेच

एकनाथ शिंदे आणि भाजपाने जर बहुमत सिध्द केले तर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. जर त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर सर्व अधिकार हे राज्यपालांकडे असतील. यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट देखील लागू शकते आणि राज्यात सहा महिन्यांच्या अगोदरच निडणूका देखील घ्याव्या लागतील. राज्यपाल कोश्यारींना कोरोनाची लागण झालीये, त्यांना रूग्णांलयामध्ये दाखल केले आहे. राज्यातील सध्याची संपूर्ण परिस्थिती बघता, महाविकास आघाडी सरकारला धोक्यात असल्याचे चित्र आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार