मुनगंटीवारांनी वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार करुन 500 कोटींचा बंगला बांधला : अमोल मिटकरी

भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील 33 कोटी वृक्ष लागवडीत मोठा भ्रष्टाचार केला. त्याच भ्रष्टाचारच्या पैशातून त्यांनी 500 कोटी रुपयांचा बंगला बांधला, असा गंभीर आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केला.

मुनगंटीवारांनी वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार करुन 500 कोटींचा बंगला बांधला : अमोल मिटकरी
Follow us
| Updated on: Jan 29, 2020 | 7:45 PM

ठाणे : भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील 33 कोटी वृक्ष लागवडीत मोठा भ्रष्टाचार केला. त्याच भ्रष्टाचारच्या पैशातून त्यांनी 500 कोटी रुपयांचा बंगला बांधला, असा गंभीर आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केला (Corruption Allegations on Sudhir Mungantiwar). अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे गटनेते आणि नगरसेवक आशिष दामले यांच्या बदलापुरातील “दादास” जिमच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

अमोल मिटकरी म्हणाले, “सर्वात आधी सुधीर मुनगंटीवार यांच्या घराची चौकशी करायला हवी. ईडीची पहिली नोटीस त्यांनाच पाठवायला हवी. सुधीर मुनगंटीवार याचं घर तब्बल 500 कोटी रुपयांचं आहे. मी स्वतः त्यांचा तो बंगला पाहिला. या बंगल्याच्या 5 व्या मजल्यावर पार्किंग आहे. रोपट्यांना एसी आहे. कलर कॉम्बिनेशनसाठी किचनचीही खास जोडणी केली आहे. 33 कोटी वृक्ष लागवडीतील इतका पैसा भ्रष्टाचार आहे. याची पाळंमुळं खोदली पाहिजे.”

मिटकरी यांच्या आरोपांवर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “33 कोटी वृक्ष लागवड काही वनविभागाने केलेली नाही. यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. माझ्यावर नीच प्रवृत्तीचेच लोक आरोप करू शकतात.” आरोप करताना एक तरी पुरावा आहे का? असाही सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय.

अमोल मिटकरी यांच्या या आरोपानंतर आता राष्ट्रावादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मागील काळात वारंवार महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका झाली आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांकडूनही मुनगंटीवर यांना लक्ष्य केलं जात असल्याचं बोललं जात आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.