मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सवावर निर्बंध लादण्यात आले आहेत. अशावेळी दहीहंडी साजरी करण्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे पदाधिकाऱ्यांकडून आज ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे बाळा नांदगावकरांसह मनसेच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक सवाल केलाय. वरुण सरदेसाईवरुन गुन्हा दाखल झाला का? तो भाचा आहे म्हणून एवढी सूट देताय का? असा सवाल देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय. (Sandeep Deshpande criticizes CM Uddhav Thackeray and Varun Sardesai)