Dilip Walse Patil | नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचा मृत्यू प्रकरण; अशा घटना का घडताहेत याचा आढावा घेणार, दिलीप वळसे पाटलांची माहिती

| Updated on: Jun 12, 2022 | 2:45 PM

महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्राचे एटीएस त्यावर लक्ष ठेवून आहे. देशभरात तसेच नागपुरातील संघ कार्यालयात असलेला दहशतवादी धोका आणि त्या संदर्भात नुकतेच आलेल्या अलर्टच्या अनुषंगाने आम्ही नक्कीच आढावा घेऊ, असंही ते म्हणाले.

Dilip Walse Patil | नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचा मृत्यू प्रकरण; अशा घटना का घडताहेत याचा आढावा घेणार, दिलीप वळसे पाटलांची माहिती
दिलीप वळसे पाटलांची माहिती
Follow us on

नागपूर : 10 जूनला राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मुस्लीम समाजाकडून निदर्शन झाली. मात्र ती शांततेच्या वातावरणात झाली. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार कुठेही घडला नाही. ज्या ज्या ठिकाणी निदर्शनं करणाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले, त्या संदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे. मात्र त्याचे प्रमाण फार कमी आहे. नागपूर जेलसंदर्भात दिलीप वळसे पाटील म्हणाले, नागपूर तुरुंगात सुधारणा करण्याच्या अनुषंगाने किंवा नवीन तुरूंग निर्माण करण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र जेलमध्ये कैद्यांच्या मृत्यूच्या घटना का घडत आहेत, या संदर्भात आढावा घेणार आहोत. नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) दोन कैद्यांचा 13 मार्च रोजी मृ्त्यू झाला. बाबूराव पंच व नरेंद्र वाहने अशी मृतकांची नावं आहेत. दोन्ही कैद्यांच्या मृत्यू प्रकरणी (death of prisoners) धंतोली पोलिसांत (Dhantoli police) गुन्हा दाखल केला. पण, या कैद्यांचा मृत्यू नेमका कसा झाला. याची चौकशी करण्यात येणार आहे.

संघ कार्यालयाला दहशतवादाचा धोका

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात तीन-चार राज्यांच्या पोलीस एकत्रित कारवाई करत आहेत. मात्र तपासासंदर्भात सार्वजनिकरित्या बोलू शकत नाही. कारण ते संवेदनशील प्रकरण आहे. महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्राचे एटीएस त्यावर लक्ष ठेवून आहे. देशभरात तसेच नागपुरातील संघ कार्यालयात असलेला दहशतवादी धोका आणि त्या संदर्भात नुकतेच आलेल्या अलर्टच्या अनुषंगाने आम्ही नक्कीच आढावा घेऊ, असंही ते म्हणाले. मध्यंतरी संघ कार्यालयाची रेकी करण्यात आली होती. याप्रकरणी तपास सुरू आहे. दहशतवादी हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे.

निदर्शन करण्यामागचं कारण काय

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी भाजपनं पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला. राज्यात औरंगाबाद, सोलापूर आणि परभणीत शर्माविरोधात निदर्शनं करण्यात आली. मुस्लीम समाजाचे लोकं एकत्र जमले. औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत निदर्शनं करण्यात आली. सोलापुरात मुस्लीम समुदायानं पक्षीय भूमिका बाजूला ठेवत निदर्शनं केली. नवी मुंबईतही निदर्शनं करण्यात आली.

हे सुद्धा वाचा