का केलाय शिंदे गटाने उद्धव ठाकरेंनी निवडलेल्या चिन्हांवर दावा; असं आहे तरी काय चिन्हांमध्ये?

ठाकरे गटाने त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय ठाकरे गटाने निवडणुक आयोगाकडे पाठवला आहे. ठाकरेंनंतर शिंदे गटानेही उगवता सूर्य आणि त्रिशूल याच चिन्हांवर दावा केला आहे.

का केलाय शिंदे गटाने उद्धव ठाकरेंनी निवडलेल्या चिन्हांवर दावा; असं आहे तरी काय चिन्हांमध्ये?
Follow us
| Updated on: Oct 10, 2022 | 7:28 PM

मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. यामुळे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) या दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा देखील वापर करता येणार नाही. दोन्ही गटांकडून चिन्हाचे पर्याय देण्यात आले आहेत. ठाकरे आणि शिंदे गटाने दिलेल्या पर्यायांपैकी दोन चिन्ह सारखी आहेत. उद्धव ठाकरेंनी निवडलेल्या चिन्हांवर शिंदे गटाने दावा केला आहे. ही चिन्ह का निवडली यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे गटाने त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय ठाकरे गटाने निवडणुक आयोगाकडे पाठवला आहे. ठाकरेंनंतर शिंदे गटानेही उगवता सूर्य आणि त्रिशूल याच चिन्हांवर दावा केला आहे. उगवता सूर्य, त्रिशूळ हिंदुत्वाचं प्रतिक म्हणून या चिन्हांवर दावा केल्याचे दीपक केसरकर म्हणाले.

लोकांपर्यंत गेल्यावर नवीन क्रांती घडते असं म्हणत केसरकर यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. आम्हालाही क्रांती घडवायची आहे असेही केसरकर म्हणाले.

ठाकरे गटाने चिन्हाचा पर्याय जाहीर केल्यानंतर रविवारी रात्री उशीरा शिंदे गटाने गदा, तलवार आणि तुतारी या तीन चिन्हांबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली.  मात्र, सोमवारी सकाळी ठाकरेंनंतर शिंदे गटानेही उगवता सूर्य आणि त्रिशूल याच चिन्हांवर दावा केला.

त्रिशूळ आणि उगवत्या सूर्याचं चिन्ह हे दोन पर्याय समान झाल्याने दोन्ही गटांना उर्वरीत राहिलेल्या चिन्हांचा पर्याय निवडावा लागणार आहे. यामुळेच ठाकरे गटाला मशाल, तर शिंदे गटाला गदा चिन्ह मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.