रोहित पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड करा, कार्यकर्त्यांचं शरद पवारांना पत्र

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या मुलाची पक्षाच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड (Demand of Rohit Patil as NCP youth president) व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

रोहित पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड करा, कार्यकर्त्यांचं शरद पवारांना पत्र
Follow us
| Updated on: Jan 30, 2020 | 7:42 PM

अहमदनगर : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या मुलाची पक्षाच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड (Demand of Rohit Patil as NCP youth president) व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे. संगमनेरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रोहित पाटील यांच्या या निवडीसाठी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे ही मागणी केली आहे. हे पत्र सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल (Demand of Rohit Patil as NCP youth president) होत आहे.

रोहित पाटील हा विधानसभा निवडणुकीपासून निवडणूक प्रक्रियेत सक्रिय झाला होता. आर आर पाटील यांच्यासारखी हुबेहुब वकृत्वशैली आणि छबी असल्यामुळे रोहित हा राज्यभर लोकप्रिय होत आहेत. सांगली जिल्ह्यातील युवकांचे मोठं संघटन आणि पाठबळ हे रोहितच्या मागे आहे. युवकांमध्ये रोहितची मोठी क्रेज आहे.

तासगाव-कवठेमहांकाळ प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे की, 2024 चा तासगाव-कवठेमहांकाळमधील आमदार हा रोहित पाटील असणार आहे. सध्या जरी रोहित हा मुंबईमध्ये कॉलेज शिकत असला तरी मतदारसंघातील लहान थोरांसोबत रोहितचा चांगला संपर्क आहे.

युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद जर रोहितला मिळाले तर राष्ट्रवादीला याचा फायदा होऊ शकतो. राष्ट्रवादीला पुन्हा एकदा आर आर पाटील यांच्यासारखे वक्तृत्त्व महाराष्ट्राला ऐकायला मिळेल.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी लिहिलेले पत्र

शरद पवार साहेब, नमस्कार.

“पत्र लिहिण्यास कारण की, महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी रोहित आर आर पाटील यांची निवड करावी, अशी विनंती आहे. साहेब तुमची लढाई आम्ही पाहत आहोत. तुमच्याच विचारांचे पाईक रोहित आर आर पाटील आहेत. देश संकटात आहे, जनतेचे मूळ प्रश्न मागे राहत आहेत. देशाची भाषाच बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुण डिप्रेशनमध्ये जात आहेत. असंघटित कामगार, शेतकऱ्यांच्या दुःखात दररोज भर पडत आहे. मराठा समाजापासून तळागाळातील समाजापर्यंत नवे प्रश्‍न निर्माण होत आहेत. या वाटा तुकोबांच्या विचाराप्रमाणे प्रकाशमान करण्यासाठी तुमच्या विचारांची आणि त्या विचाराला गती देणार्‍यांची गरज आहे. तुमच्या विचाराला गती रोहित आर आर पाटील देऊ शकतात, असे आम्हाला वाटते. त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांना काम करण्याची संधी द्यावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विनंती करत आहोत.”

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.