मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कवरील भाषण विधानसभेत केले : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरले होते की, ते विधानसभेत आहेत म्हणून त्यांनी शिवाजी पार्कवरील भाषण केले, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis criticized CM Uddhav Thackeray) यांनी हल्लाबोल केला.

  • Updated On - 1:02 pm, Thu, 19 December 19 Edited By:
मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कवरील भाषण विधानसभेत केले : देवेंद्र फडणवीस

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरले होते की, ते विधानसभेत आहेत म्हणून त्यांनी शिवाजी पार्कवरील भाषण केले, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis criticized CM Uddhav Thackeray) यांनी हल्लाबोल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना भाजप आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis criticized CM Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाबाहेर येऊन माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरले होते की, ते विधानसभेत आहेत म्हणून त्यांनी शिवाजी पार्कवरील भाषण केले. या सरकारने आज शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकही घोषणा केली नाही. पहिल्याच अधिवेशनात या सरकारने दिलेले वचन पाळले नाही म्हणून आम्ही सभात्याग केला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

“राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री उत्तर देतील त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती. पण त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय काढला नाही. त्यासोबतच मराठा आरक्षण अशा मुद्द्यांनाही त्यांनी बगल दिली”, असंही फडणवीस म्हणाले.

“उद्धव ठाकरेंनी वचन दिले होते की शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत देऊ पण त्यांनी काही मदत केलेली नाही. हे विश्वासघातकी सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिले मुख्यमंत्री असतील ज्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर काही उत्तरे दिलेले नाही”, असंही फडणवीस यांनी सांगितले.

“मुख्यमंत्री खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही याचा आम्ही निषेध करतो आहे. त्यामुळे आम्ही सभात्याग केला”, असं फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात गोमाता आणि बाजूला जाऊन खाता? सावरकरांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांनी भाजपचे कान उपटले

विधानसभेत उद्धव ठाकरेंचे एकाचवेळी चौकार, षटकार, गुगली आणि यॉर्कर !

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI