AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? आक्रमक फडणवीस बैठकीतून बाहेर

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? आक्रमक फडणवीस बैठकीतून बाहेर
Devendra Fadnavis
Updated on: Jun 22, 2021 | 2:15 PM
Share

मुंबई : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. शिवसेना-भाजप युती होणार का ही चर्चा केवळ माध्यमात आहे. देशाच्या लोकशाहीमध्ये महाविकास आघाडीसारखी सरकारं जास्तकाळ टिकत नाहीत, हे सरकार ज्यावेळी पडेल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याचं पावसाळी अधिवेशन होऊच नये, यासाठी कोरोनाचं कारण दिलं जात आहे, असा आरोप फडणवीसांनी केला. (Devendra Fadnavis attacks Maharashtra Thackeray govt over Maharashtra Legislative assembly session)

ठाकरे सरकारने पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे.

जेव्हा जेव्हा अधिवेशन जवळ येतं, तेव्हा कोरोना वाढल्याच्या बातम्या किंवा भूमिका राज्य सरकारकडून केला जातोय. कोरोनाचा बहाना पुढे घेऊन राज्याचं अधिवेशनच घेऊ नये असा सरकारचा प्रयत्न आहे. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

एकीकडे राज्यात हजारोंच्या संख्येने पक्ष कार्यालय उद्घाटन चालतं. मग अधिवेशन का नाही, असा प्रश्न करत विरोधी पक्षाने विधीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. लोकशाहीची थट्टा सुरु असल्याने आम्ही बैठकीतून बाहेर पडलो, असं फडणवीसांनी सांगितलं.

फक्त दोन दिवसांच अधिवेशन असताना राज्यातल्या प्रश्नांवर चर्चा कशी करणार? विशेष अधिवेशन करण्याची गरज असताना आहे ते अधिवेशनही घेणार नाही अशीच सरकारची भूमिका आहे. लोकशाही बासनात गुंडाळायची सरकारची कार्यपद्धती आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीवरून काहीच भूमिका नाही. संसदीय लोकशाहीत ही गंभीर बाब आहे. अर्निबंध प्रशासन आणि मंत्री यांच्यावर प्रश्न विचारायचेच नाहीत का? असे प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केले.

संबंधित बातम्या  

नाना पटोलेंच्या ‘एकला चलो रे’वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज?; आघाडीत अस्वस्थता वाढली

गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?.
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले.
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार.
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी.
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका.