AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रितेश देशमुख राजकारणात येणार? देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा सल्ला, पाहा नेमकं काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'टीव्ही 9 मराठी'च्या 'आपला बायोस्कोप 2023' या मनोरंजन क्षेत्रातील कलावंतांच्या पहिल्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुख यांना मोलाचा सल्ला दिला आहे. फडणवीसांनी आपल्या मनोगतात एक राजकीय भविष्यवाणी वर्तवली आहे. पण ती भविष्यवाणी वर्तवत असताना त्यांनी रितेश देशमुख याचाही उल्लेख केलाय.

रितेश देशमुख राजकारणात येणार? देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा सल्ला, पाहा नेमकं काय म्हणाले?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 09, 2023 | 10:16 PM
Share

मुंबई | 9 डिसेंबर 2023 : ‘टीव्ही 9 मराठी’चा ‘आपला बायोस्कोप 2023’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील हजेरी लावली. तसेच अभिनेता रितेश देशमुख सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होता. या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतमध्ये रितेश देशमुखला मोलाचा सल्ला दिला. विशेष म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील आगामी घडामोडींविषयी मोठा दावा केला. यावेळी त्यांनी रितेश देशमुखचा उल्लेख केला. त्यांनी रितेश देशमुख याच्या राजकारणातील एन्ट्रीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं.

“तुम्ही पहिल्या वर्षी आम्हाला बोलवलं. पुढच्या वर्षी आम्हालाच बोलवा. पुढच्याही वर्षी डिसेंबरमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मीच राहणार आहे. अर्थात याला एक कॅव्हिट आहे, रितेशजी राजकारणात यायचं नाही आणि आलात तर कुठून यायचं ते मी तुम्हाला सजेस्ट करतो, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला. “आमच्यासोबत अजित दादांनाही बोलवा तेही एक वेगळे कलाकार आहेत”, असंदेखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

‘मराठी रंगमंच हा अतिशय दमदार’

“तुम्ही हा पुरस्कार सुरु केला याचा मला अतिशय आनंद आहे. मराठी रंगमंच हा अतिशय दमदार आहे. देशामध्ये कलात्मकता ज्यांनी जपली ते आपण मराठी लोकं आहोत. कदाचित आमचं बजेट मोठं नसेल. पण मी हे दाव्याने सांगतो जी कलात्मकता मराठी सिनेमा, मालिकांमध्ये आहे ती कुठेच बघायला मिळत नाही. मराठी कलावंतांनी नाटक जिवंत ठेवलं आहे. नाटक जिवंत ठेवण्याचं सर्वात जास्त काम मराठी कलावंतांनी केलं आहे. त्यामुळे अशाप्रकारे पुरस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण जे चांगलं आहे त्याचं कौतुक करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते आज या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून केलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी

“या ठिकाणी जवळपास सर्वच चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या क्षेत्राशी संबंधित आहेत. कारण धर्मवीर चित्रपटाचे ते निर्माते आहेत. त्याचा पार्ट 2 देखील येतोय. प्रसाद ओक या ठिकाणी आहेतच. मीच एकटा असा आहे, नाही चित्रपटात तर श्रेया तुमच्याकडे मला एकदा रोल असेल तर बघा. कारण माझ्या एका व्हिडीओवरुन इतक्या मिम्स तयार झाल्या ते पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की हास्य कलाकार म्हणून आपल्याला थोडासा तरी चान्स आहे”, अशी टोलेबाजी फडणवीसांनी यावेळी केली.

Follow Us
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर