Devendra Fadanvis: मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस ‘पॉवर’फुल!  गृह, अर्थ खात्यासह 7 खाती तर शिंदे गटाला तुलनेत कमी महत्त्वाची खाती

एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे सत्ता स्थापनेपासून पॉवरफुल होतेच, ते या खातेवाटपानंतर अधिक पॉवरफुल झालेले आहेत. राज्याचे महत्त्वाचे गृहखाते फडणवीस यांना देण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्याचे अर्थमंत्रीपदही त्यांच्याकडेच असणार आहे. यासह विधी आणि न्याय, जलसंपदा, गृहनिर्माण, उर्जा आणि राजशिष्ठाचार ही खातीही फडणवीस यांच्याकडेच देण्यात आली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात सर्वाधिक जास्त ताकदवान मंत्री अशीही त्यांची आगामी काळात ओळख असणार आहे.

Devendra Fadanvis: मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस 'पॉवर'फुल!  गृह, अर्थ खात्यासह 7 खाती तर शिंदे गटाला तुलनेत कमी महत्त्वाची खाती
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 5:20 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे खातेवाटप अखेरीस जाहीर झाले आहे. अपेक्षेप्रमाणे खातेवाटपात अनेक धक्का तंत्रांचा वापर करण्यात आलेला दिसतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त पॉवरफुल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत. राज्याचे अर्थ, गृह, ऊर्जा, जलसंपदा, गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती फडणवीस यांच्याकडे ठेवलेली आहे. सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावण्यांमुळे विधी आणि न्याय खातेही महत्त्वाचे झाले आहे. त्यात सरकारचे भवितव्य, ओबीसी, मराठा आरक्षण यासारखे विषय असल्याने फडणवीस यांनी तेही खाते स्वताकडेच ठेवलेले दिसते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11 खाती असली तरी राज्यातील सर्वाधिक महत्त्वाची खाती ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणती खाती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, अपक्षेप्रमाणे नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण, अल्पसंख्याक या ११ खात्यांसह इतर वाटप नझालेली खाती ही एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाची खाती ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळालेली आहेत.

देवेंद्र फडणवीस सर्वाधिक पॉवरफुल

एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे सत्ता स्थापनेपासून पॉवरफुल होतेच, ते या खातेवाटपानंतर अधिक पॉवरफुल झालेले आहेत. राज्याचे महत्त्वाचे गृहखाते फडणवीस यांना देण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्याचे अर्थमंत्रीपदही त्यांच्याकडेच असणार आहे. यासह विधी आणि न्याय, जलसंपदा, गृहनिर्माण, उर्जा आणि राजशिष्ठाचार ही खातीही फडणवीस यांच्याकडेच देण्यात आली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात सर्वाधिक जास्त ताकदवान मंत्री अशीही त्यांची आगामी काळात ओळख असणार आहे.

शिंदे गटाला तुलनेत कमी महत्त्वाची खाती

एकूण एकनाथ शिंदे सरकारचा विस्तार आणि त्यांच्या गटाला मिळालेली खाती पाहता तुलनेने कमी महत्त्वाची खाती ही एकनाथ शिंदे गटाकडे गेल्याचे दिसते आहे. गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा, दादा भुसेंना बंदर आणि खनिकर्म खाते, संजय राठोडांना अन्न आणि औषध प्रशासन, संदीपान भुमरे यांना रोहयो आणि फलोत्पादन, उदय सामंत यांना उद्योग खाते, तानाजी सावंत यांना आरोग्य खाते, अब्दुल सत्तार यांना कृषी आणि दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा, राज्य उत्पादन शुल्क शंभूराजे देसाई यांना देण्यात आले आहे. थोडक्यात कृषी, आरोग्य, उत्पादन शुल्क, नगरविकास ही महत्त्वाची खातीच शिंदे गटाला मिळालेली दिसत आहेत.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.