Devendra Fadnavis on Shivsena : ‘मोटा भाई कोण छे, हे अमितभाईंनी 2014 मध्येच दाखवून दिलं’, फडणवीसांनी सेनेला पुन्हा डिवचलं

मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात मोठा वाद झाला आणि राज्यातील राजकारणच पालटून गेलं. यापूर्वी राज्यात शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेना मोठा भाऊ तर भाजप लहान भाऊ असायचा. मात्र मोठा भाऊ कोण हे अमित शाह यांनी 2014 मध्येच दाखवून दिल्याचा जोरदार टोला फडणवीस यांनी लगावलाय.

Devendra Fadnavis on Shivsena : मोटा भाई कोण छे, हे अमितभाईंनी 2014 मध्येच दाखवून दिलं, फडणवीसांनी सेनेला पुन्हा डिवचलं
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Apr 26, 2022 | 9:47 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप आणि टीका सुरु आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलाच वाद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला (Shivsena) डिवचण्याचा प्रयत्न केलाय. 2019 ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना युतीत लढले. मात्र मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात मोठा वाद झाला आणि राज्यातील राजकारणच पालटून गेलं. यापूर्वी राज्यात शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेना मोठा भाऊ तर भाजप लहान भाऊ असायचा. मात्र मोठा भाऊ कोण हे अमित शाह यांनी 2014 मध्येच दाखवून दिल्याचा जोरदार टोला फडणवीस यांनी लगावलाय.

‘शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप छोटा भाऊ हे शाहांनी बदललं’

अमित शाह आणि भाजपची वाटचाल या मूळ इंग्रजई पुस्तकाच्या मराठी अनुवाद असलेल्या पुस्तक प्रकाशन देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. 2014 मध्ये शिवसेनेशिवाय लढण्याचा निर्णय आम्ही घेतला. पण 288 जागा कशा लढवणार अशी चिंता आम्हाला होती. पण अमितभाई म्हणाले की चिंता करायची नाही. साडे तीन महिने ते मुंबईत होते. 24 तास मुंबईत बसून होते आणि आम्ही 122 जागा निवडून आणल्या. शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप छोटा भाऊ हे त्यांनी बदललं. सर्वांना कळलं की मोठा भाऊ कोण आहे, असा जोरदार टोला फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय.

आज अमित शाह आणि भाजपची वाटचाल या मूळ इंग्रजीमध्ये असेलल्या पुस्तकाच्या मराठी अनुवाद पुस्तक प्रकाशन पार पडलं. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, आशीष शेलार, अतुल भातखळकर, उदय निरगुडकर, रमेश पतंगे, अनिर्बान गांगुली, शिवानंद द्विवेदी, डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीसांनी अमित शाह यांच्या नेतृत्वाचं तोंडभरुन कौतुक केलं.

’80 पैकी 73 जागा जिंकण्याचा विक्रम शाहांनी साकारला’

फडणवीस म्हणाले की, या पुस्तकातून अमित शाह यांचा संपूर्ण जीवनपट साकारण्यात आला आहे. भाजपची वाटचाल आणि त्यात अमित शाह पर्व याचा संपूर्ण मागोवा त्यात आला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा, सोपे करून सांगण्याचे काम लेखकांनी केले आहे. अमित शाह यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी आली तेव्हा त्यांनी अतिशय बारकाईने त्या राज्याचा अभ्यास केला. सर्व निवडणुका लढण्याचा त्यांचा निर्णय हा उत्तर प्रदेशातील राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. 80 पैकी 73 जागा जिंकण्याचा विक्रम त्यातून साकारला.

अमित शाहांचं व्यक्तिमत्व फडणवीसांनी उलगडलं

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा अतिशय सखोल अभ्यास अमित शाह यांनी केला आहे. अनेक तास ते यावर बोलू शकतात. त्यावर एक पुस्तक त्यांनी लिहिले आहे. देश-विदेशातून त्यासाठी त्यांनी संदर्भ गोळा केले. या पुस्तकाचे प्रकाशन अजून व्हायचे आहे, अशी माहितीही फडणवीसांनी यावेळी दिली. त्याचबरोबर कुटुंब वत्सल आणि संवेदनशील असे अमित शाह यांचे व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या नातीशी दिवसभरातील व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ते दररोज बोलत असतात. तसंच शाह यांची निर्णय क्षमता अतिशय मोठी आहे. स्वतः दौरे करून अभ्यास करायचा आणि निर्णय घ्यायचा, हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

Gunratna Sadavarte : जेलमधून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी मानले भाजप नेत्यांचे आभार, म्हणाले माझी हत्या झाली तर…

Navneet Rana : संजय राऊतांचे नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप, राणांनी डी गँगशी संबंधित लखडावालाकडून कर्ज घेतलं?