AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gunratna Sadavarte : जेलमधून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी मानले भाजप नेत्यांचे आभार, म्हणाले माझी हत्या झाली तर…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना विनंती करतो की आमची जर हत्या झाली तर आमच्या हत्येनंतर आपण योग्य ती पावलं उचलावीत. जेणेकरुन कष्टकऱ्यांचा आवाजाची हत्या होणार नाही. जसं नारायण राणे म्हणाले की सूड उगवू नका. त्याचप्रमाणे आमचा सूड उगवला जाणार नाही, याची काळजी आपण घ्यावी, असं आवाहन सदावर्ते यांनी भाजप नेत्यांना केलंय.

Gunratna Sadavarte : जेलमधून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी मानले भाजप नेत्यांचे आभार, म्हणाले माझी हत्या झाली तर...
वकील गुणरत्न सदावर्ते Image Credit source: TV9
| Updated on: Apr 26, 2022 | 8:28 PM
Share

मुंबई : एसटी कामगारांसाठी न्यायालयीन लढा लढणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) अखेर 18 दिवसानंतर जेलबाहेर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर सदावर्ते यांना 8 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यानंतर सदावर्ते यांना सातारा पोलीस आणि कोल्हापूर पोलिसांनीही ताब्यात घेतलं होतं. अखेर आज त्यांना अटकेपासून दिलासा मिळाला. संध्याकाळी सव्वा सात वाजता सदावर्ते आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Prison) बाहेर आले. त्यावेळी पत्नी जयश्री पाटील आणि मुलगी झेन यांनी त्यांचं पुष्पहार घालून स्वागत केलं. जेलमधून बाहेर येताच सदावर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसंच माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप नेत्यांचे आभार मानले आणि आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांनी भाजप नेत्यांचे आभारही मानले आहेत.

जीवाला धोका असल्याचं सांगत भाजप नेत्यांना आवाहन

‘मी इतके दिवस ज्या ज्युडिशिअरीमध्ये काम करतो, माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे की त्यांनी आज लिबर्टीबद्दल भाष्य केलं. मला माहिती नाही की सरकारला लिबर्टीचा अर्थ किती समजला ते. पण सरकार तुम्ही जे गुणरत्न सदावर्तेसोबत केलं ते कुण्याही कष्टकऱ्यासोबत करु नका. कष्टकरी चळवळीला मोडित काढण्याचा प्रयत्न करु नका. असे गुन्हे दाखल केल्यानंतर शिखर निघत नसतं हे लक्षात असावं, हे आदरपूर्वक महाराष्ट्रातील सरकारला सांगतो. मी अधिक जबाबदारी अशी मानतो की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना विनंती करतो की आमची जर हत्या झाली तर आमच्या हत्येनंतर आपण योग्य ती पावलं उचलावीत. जेणेकरुन कष्टकऱ्यांचा आवाजाची हत्या होणार नाही. जसं नारायण राणे म्हणाले की सूड उगवू नका. त्याचप्रमाणे आमचा सूड उगवला जाणार नाही, याची काळजी आपण घ्यावी’, असं आवाहन सदावर्ते यांनी भाजप नेत्यांना केलंय. तसंच भाजप नेत्यांचे आभारही त्यांनी मानले.

सदावर्तेंनी पोलीस शिपायाचे प्राण वाचवले

गुणरत्न सदावर्ते यांनी आपले जेलमधील 18 दिवस कसे गेले हे देखील सांगितलं. ‘मी पहिल्यांदा पोलीस कस्टडीत होतो तिथे एक पोलीस शिपायाचा जीव वाचवू शकलो. तिथे एका पोलीस शिपायाला हृदयविकाराचा झटका आला होता. कोणत्याही फौजदाराला प्रथमोपचार माहिती नव्हते. मी त्यांना आर्टिफिशियल रेस्पिरेशन देऊन वाचवू शकलो. मी ज्या ज्या लॉकअपमध्ये गेलो तिथे त्यांना योगाचं शिक्षण दिलं. मी स्पिरिच्यूअल टॉक केले. मला एक माहिती तुम्ही कुठेही जा, तुम्ही वाईटातील वाईट बाजूला करुन चांगल्यांना चांगलं शिकवू शकता. हे मी 18 दिवसांत अनुभवलं’, असंही सदावर्ते यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

Gunratna Sadavarte : तब्बल 18 दिवसानंतर गुणरत्न सदावर्तेंची सुटका! छाती ठोकत म्हणाले, जय भीम, वंदे मातरम, एसटी कामगार

Sanjay Raut on Rana : राणा प्रकरणात विरोधी पक्ष उघडा पडला, राणा दाम्पत्याच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर राऊतांचा भाजपवर निशाणा

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.