AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana : संजय राऊतांचे नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप, राणांनी डी गँगशी संबंधित लखडावालाकडून कर्ज घेतलं?

आधीच जेलमध्ये असणाऱ्या नवनीत राणा यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहे. नवनीत राणा यांनी डी गँगशी संबंधित लखडवाला याच्याकडून कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

Navneet Rana : संजय राऊतांचे नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप, राणांनी डी गँगशी संबंधित लखडावालाकडून कर्ज घेतलं?
नवनीत राणा यांचे संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 26, 2022 | 9:03 PM
Share

मुंबई : एका प्रकरणात जेलमध्ये असणाऱ्या नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केले आहे. नवनीत राणा यांनी डी गँगशी (D Gang) संबंधित लखडावाला याच्याकडून कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसेच आता केंद्रीय तपास यंत्रणा राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून यात लक्ष घालणार का? असा सवालही संजय राऊतांनी केला आहेत. काही दिवसांपूर्वीच या लखडावालाचं जेलमध्ये निधन झाले आहे. त्यामुळे एका प्रकरणात आधीच जेलमध्ये असणाऱ्या नवनीत राणा यांच्यावर राऊतांच्या या आरोपानंतर चौकशीचा नवा सिसेमिरा लागणार का? तसेच या आरोपाबाबत नवनीत राणा यांची कोणतीही बाजू समोर अजून आलेली नाही, त्यामुळे या प्रकरणाबाबत राणा काय स्पष्टीकरण देणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र राऊतांच्या या आरोपांनंतर पुन्हा मोठी खळबळ माजली आहे.

संजय राऊत यांचे आरोप नेमके काय?

नवाब मलिक यांच्यावरून टीका करणाऱ्या भाजपला संजय राऊतानीही त्याच स्टाईलने उत्तर दिले आहे. संजय राऊतांनी ट्विटरवरून आरोप करताना म्हटले आहे की,  नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतले होते, ज्याचा तुरुंगात मृत्यू झाला होता. याच लकडावालाला ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती आणि त्याचे डी गँगशी संबंध होते. आता माझा सवाल आहे की, ईडीने याची चौकशी केली का? राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे!, असा खळबळजनक दावा आणि सवाल संजय राऊतांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा नवं ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांचे ट्विट

आता नवा वाद पेटणार?

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हिंदुत्वावरून वाद सुरू आहे. त्यात हनुमान चालीसाचा मुद्दा पुढे आल्याने राजकारण आणखी तापलं. हे प्रकरण आता राणा दाम्पत्याला जेलपर्यंत घेऊन गेलं आहे. त्यावरून भाजपने आक्रमक होत महाविकास आघाडीवर अनेक आरोप केले आहेत. मात्र आता संजय राऊतांच्या आरोपांनी हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते सतत राष्ट्रीय सुरक्षा आणि डी गँग यांच्यावरून नवाब मलिक आणि राज्य सरकारवर टीका करत आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याच स्टाईलमध्ये त्यांच्यावर पलटवार केला आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार