पृथ्वीराज चव्हाणांच्या जिल्ह्यात जाऊन मुख्यमंत्र्यांचा ‘बाबां’ना थेट सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Karad) यांनी कराडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan ) यांना त्यांच्याच जिल्ह्यात जाऊन थेट सवाल विचारला.

पृथ्वीराज चव्हाणांच्या जिल्ह्यात जाऊन मुख्यमंत्र्यांचा 'बाबां'ना थेट सवाल
Follow us
| Updated on: Sep 16, 2019 | 11:30 AM

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Karad) यांच्या नेतृत्त्वातील महाजनादेश यात्रा साताऱ्यात होती. आज ही यात्रा सांगलीकडे रवाना होत आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Karad) यांनी कराडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan ) यांना त्यांच्याच जिल्ह्यात जाऊन थेट सवाल विचारला.

पृथ्वीराज चव्हाण यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही 370 च्या विरोधातले की बाजूचे? तुम्ही भारताच्या बाजूचे की नाहीत?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला.

आकडेवारी कुठून दिली?

“पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की महाराष्ट्र उद्योगात आठव्या क्रमांकावरुन तेराव्या क्रमांकावर गेला. ही आकडेवारी कुठून आणली माहिती नाही. आकडेवारी दिली नाही असं ते म्हणतात, पण सगळी आकडेवारी केंद्र सरकारच्या वेबसाईटवर आहे. त्यांच्या काळात महाराष्ट्र आठव्या क्रमांकवर गेला ही त्यांनी कबुली दिली. ते आरोप करतात उदयनराजे भोसले यांनी तीन महिन्यात राजीनामा दिला म्हणजे लोकशाहीचा खून आहे. त्यांच्या काळात किती वेळा खून झाला याचा विचार करा”, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला.

सामना अग्रलेख

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना उदयनराजेंची स्टाईल आणि ‘सामना’तील  अग्रलेखावरुनही प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “उदयनराजे मुक्त विदयापीठ आहे, हवे तिथे शिस्त पाळतात. कधी ते शिस्तीत तर कधी ते त्यांच्या स्टाईलने राहतील. सामना हे वर्तमानपत्र आहे. सत्य काय आहे ते जनतेला समजतं”

महाजनादेश यात्रेने आतापर्यंत 3 हजार किमी प्रवास केला. 112 विधानसभा मतदारसंघात यात्रा पोहोचली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

युतीवर भाष्य

आमचा संवाद योग्य पद्धतीने सुरु आहे.  युतीची घोषणा लवकरच होईल. नाशिकमध्ये युतीची घोषणा होणार नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

संबंधित बातम्या 

शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे भाजपमध्ये चालणार नाही, शिवसेनेची उदयनराजेंना समज  

भाजपप्रवेशाची ऑफर होती, पण… : पृथ्वीराज चव्हाण     

उदयनराजेंविरुद्ध आघाडीचा एक्का बाहेर, पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी? 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.