एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का, सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत आमदार सदा सरवणकर गोळीबार प्रकरणाविषयी महत्त्वाची माहिती दिली. सदा सरवणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का, सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल, देवेंद्र फडणवीस यांची माहिती
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 5:02 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आज विधान परिषदेत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे सदा सरवणकर यांच्याकडील रिव्हॉल्वरचं लायसन्सदेखील रद्द करण्याची कारवाई सुरु करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

“राज्यात लोकप्रतिनिधी आणि खासगी व्यक्तींकडून झालेला गोळीबार हा विषय आपण मांडला होता. ज्यामध्ये आपण सदा सरवणकर यांचा विषय मांडला होता. या नमूद गुन्ह्यामध्ये 14 साक्षीदार तपासले. या प्रकरणात सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर असे एकूण 11 आरोपींवर कलम 41 अ अन्वये नोटीस देण्यात आली”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“त्याचप्रमाणे त्यांचं जे लायसन्सधारी पिस्तूल आहे ते त्यांनी स्वत: सोबत बाळगणं आवश्यक असताना त्यांनी ते गाडीत ठेवलं. असं ते ठेवता येत नाही. त्यामुळे आर्म्स अॅक्ट 1969 चे कलम 30 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी लायसन्स आणि शर्थी नियमांचं उल्लंघन केलं असल्याने त्यांना जो काही शस्त्र परवाना दिलाय तो रद्द करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

सदा सरवणकर यांच्याच पिस्तूलमधून गोळीबार

या प्रकरणी 15 दिवसांपूर्वी पोलिसांकडून मोठा खुलासा करण्यात आला. सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून हवेत गोळीबार झाला होता. पण तो गोळीबार सदा सरवणकर यांनी केला नव्हता, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे गोळीबाराची घटना खरी होती हे पोलीस तपासातून देखील स्पष्ट झाल्याचं याआथीच समोर आलंय. संबंधित प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे. या प्रकरणी विधान परिषदेत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं.

नेमकं प्रकरण काय?

दादरच्या प्रभादेवी परिसरात काही महिन्यांपूर्वी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आल्याचं समोर आलेले. त्यातून उफाळलेल्या वादात पुढे गोळीबार झालेला. हा गोळीबार आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप करण्यात येत होता. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. पण आतापर्यंत पोलीस तपासातून एक गोष्ट समोर आलीय, ती म्हणजे त्यावेळी गोळीबार झाला होता. पण सदा सरवणकर यांनी तो गोळीबार केला नव्हता, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आलीय.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.