एकच उल्हास, बाकी सब खल्लास, धैर्यशील माने यांचं खणखणीत भाषण

एक पाऊल उल्हासदादा माझ्यासाठी चालले, दहा पावलं हा धैर्यशील त्यांच्यासाठी चालणार आहे, असं म्हणत हातकणंगलेचेे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी शिरोळचे उमेदवार उल्हास पाटील यांचं गुणगान गायलं

एकच उल्हास, बाकी सब खल्लास, धैर्यशील माने यांचं खणखणीत भाषण
Follow us
| Updated on: Oct 13, 2019 | 10:59 AM

कोल्हापूर : एकच उल्हास, बाकी सब खल्लास, अशी गर्जना शिवसेनेचे हातकणंगलेमधील खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane Campaign for Ulhas Patil) यांनी केली. शिरोळमधील शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार उल्हास पाटील यांच्या प्रचारावेळी धैर्यशील माने यांनी केलेलं खणखणीत भाषण चांगलंच गाजलं.

धैर्यशील माने यांनी शिरोळमध्ये आपल्या वक्तृत्व शैलीतून शिवसैनिकांमध्ये नवी स्फूर्ती आणि नवी ऊर्जा निर्माण केली. उल्हास पाटलांसाठी आपण सदैव तत्पर असल्याची भूमिका यावेळी धैर्यशील मानेंनी मांडली.

‘कोणी काहीही बोलू देत, पण येत्या 21 तारखेला शिवछत्रपतींचा भगवा शिरोळमध्ये डौलाने फडकणार आहे. एक पाऊल उल्हासदादा माझ्यासाठी चालले, दहा पावलं हा धैर्यशील त्यांच्यासाठी चालणार आहे. जिथे कमी पडेल, तिथे मी असेन. आता आमदारही तुमचा आणि खासदारही तुमचा’ असंही माने (Dhairyasheel Mane Campaign for Ulhas Patil) यावेळी म्हणाले.

मी विरोधकांवर टीका करणार नाही, कोणाला वाईट-वंगाळ बोलणार नाही. पण कार्यक्रम करेक्ट करणार आहे, असं म्हणत धैर्यशील मानेंनी विरोधकांना गप्प केलं. उल्हास पाटील यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर सावकार मदनाईक रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मानेंनी ‘स्वाभिमानी’च्या राजू शेट्टी यांचा पराभव केला होता.

जोरदार पावसाला धारदार भाषणाने उत्तर, उभ्या पावसात धैर्यशील मानेंची खणखणीत सभा

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या प्रचार सभेवेळी धो धो पाऊस कोसळू लागला. त्यामुळे काही क्षण उपस्थितांची तारांबळ उडाली होती. सभेला आलेल्या खासदारांच्या डोक्यावर छत्री धरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र धैर्यशील माने यांनी छत्री मिटवून बाजूला ठेवली आणि उभ्या पावसात, खड्या आवाजात भाषण सुरु केलं. खासदार मानेंचं धैर्य पाहून उपस्थितांची चुळबूळ थांबली आणि सर्वजण जिथल्या तिथे स्थिरावले होते.

धैर्यशील माने यांनी तब्बल 93 हजार 785 मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतरही धैर्यशील माने यांनी खिलाडूवृत्ती दाखवत राजकारणातील नवा कोल्हापुरी पॅटर्न देशाला दाखवून दिला होता. थेट राजू शेट्टी यांचं घर गाठून त्यांच्या मातोश्रींचा आशीर्वाद मानेंनी घेतला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.