आदित्य ठाकरे पेंग्विनसाठी रडतात म्हणून त्यांना पेंग्विन म्हणतात : धनंजय मुंडे

पेंग्विनचं पिल्लू मेल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू आले, त्यामुळे त्यांना मुंबईत पेंग्विनच म्हणतात, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेवर टीका केली आणि उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.

आदित्य ठाकरे पेंग्विनसाठी रडतात म्हणून त्यांना पेंग्विन म्हणतात : धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Aug 20, 2019 | 9:49 PM

वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) भाजप-शिवसेना नेत्यांवर सडकून टीका करत आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या टीकेनंतर त्यांनी (Dhananjay Munde) आता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंवरही (Aditya Thackeray) टीका केली आहे. पेंग्विनचं पिल्लू मेल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू आले, त्यामुळे त्यांना मुंबईत पेंग्विनच म्हणतात, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेवर टीका केली आणि उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील सभेत धनंजय मुंडे बोलत होते. शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा चालू आहे, तर भाजपची महाजनादेश यात्रा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यात्रेत सरकारने केलेली कामं सांगतात. पण ही कामं फक्त त्यांच्या पुण्यवान कार्यकर्त्यांनाच दिसतात, सामान्य जनतेला दिसत नाहीत, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात सर्वांच्या अपेक्षाभंग केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात रोज मर्डर होत आहेत. त्यामुळे आपण किती सुरक्षित आहोत यावरून स्पष्ट होतं. दिवसाला 5 ते 6 शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकार मात्र महाजनादेश यात्रा काढत आहे. त्यामुळे आमचं सरकार आणा, सरसकट सातबारा कोरा करू, तसेच राज्यात असलेल्या लाखो जागा भरु, ज्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल, असं आवाहन धनंजय मुंडेंनी केलं.

महापुराला सरकार जबाबदार : अजित पवार

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेला महापूर हा मानवनिर्मित असून याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. बाधित लोकांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढत आहेत. आधी बाधित लोकांना मदत करा आणि नंतर यात्रा काढा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारचा समाचार घेतला. शिवस्वराज यात्रा वाशिम जिल्ह्यात आली असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Non Stop LIVE Update
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.