भाजपने रायगडावर नाक घासून जनतेची माफी मागावी : धनंजय मुंडे

"भाजपने रायगडावर येऊन नाक घासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची माफी मागावी", अशी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Aaj ke Shivaji Narendra Modi) यांनी केली.

भाजपने रायगडावर नाक घासून जनतेची माफी मागावी : धनंजय मुंडे

बीड : “भाजपने रायगडावर येऊन नाक घासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची माफी मागावी”, अशी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Aaj ke Shivaji Narendra Modi) यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केल्याने संपूर्ण देशभरातून भाजपावर टीका केली जात आहे. बीडमधील एका कार्यक्रमानंतर धनंजय मुंडेंनी टीव्ही 9 सोबत बोलताना भाजपवर निशाणा साधला.

“केंद्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या भाजपने स्पष्ट करावं की मोदींची तुलना महाराजांसोबत करणे हा महाराजांचा अपमान असेल, तर भाजपने रायगडावर येऊन नाक घासून महाराजांच्या मावळ्यांची माफी मागावी”, असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Aaj ke Shivaji Narendra Modi) म्हणाले.

“भाजपच्या एका कार्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जे सर्वांच्या रक्तात आहेत. त्या महाराजांची तुलना मोदींच्या बरोबर करणे म्हणजे भाजपच्य्या या औलांदीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती सुरुवातीपासून किती घृणा आहे, असंही मुंडे म्हणाले.

“ज्या पद्धतीने भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा पावला पावलांवर अपमान करत आहे. यावरुन भापजने लक्षात घ्यावं त्यांना या भारतात, महाराष्ट्रात उथळ माथ्यानं उद्या फिरायचं आहे. अन्यथा तुम्हाला राज्य आणि केंद्रातील जनता फिरू देणार नाही”, असंही मुंडेंनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने महाराजांचा अपमान कधी सहन केला नाही. मात्र आता मर्यादेच्या बाहेर चाललंय आणि सहनशक्तीच्या बाहरे चलालंय आहे, असं मुंडे म्हणाले.

दरम्यान, भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेलं ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे काल (12 जानेवारी) प्रकाशन करण्यात आले. भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात मोदींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाजपवर नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.

संबधित बातम्या : 

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, भाजपकडून पुस्तक प्रदर्शित, सोशल मीडियावर संताप

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *