AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मै जब भी बिखरा हूँ, दुगनी रफ्तारसे निखरा हूँ, धनंजय मुंडे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरँग होतंय?

Dhananjay Munde case : कालपर्यंत विलन वाटणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवरच एकामागे एक असे तीन आरोप झाले.

मै जब भी बिखरा हूँ, दुगनी रफ्तारसे निखरा हूँ, धनंजय मुंडे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरँग होतंय?
धनंजय मुंडे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jan 15, 2021 | 3:31 PM
Share

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप करुन रेणू शर्मा (Renu Sharma) यांनी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या गंभीर आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर गंडांतर आल्याचं चित्र होतं. विरोधकांनी तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार करुन, आमदारकीच रद्द करण्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी सहमतीतून संबंधातून दोन मुलं असल्याचं जाहीर केलं. मात्र करुणा शर्मा (Karuna Sharma) यांची बहीण रेणू शर्मा यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Dhananjay Munde speech tum lakh koshish karo mujhe badnaam karne ki)

या प्रकारानंतर रेणू शर्मा यांनी पुन्हा एकदा पोलीस स्टेशन गाठून धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रारीचा पाढा वाचला. जिथे धनंजय मुंडे विलन ठरतायत असं वाटत असतानाच, चित्र तेव्हा बदललं जेव्हा भाजपचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी याप्रकरणात एण्ट्री घेतली. कृष्णा हेगडे यांनी थेट रेणू शर्मा यांनी आपल्यालाही हनिट्रॅप करुन जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा केला. इतकंच नाही तर रेणू शर्मा यांनी आपल्यालाही कॉल, मेसेज केलेच, पण मनसे नेते मनीष धुरी यांनाही असंच फसवण्याचा प्रयत्न केल्याचं हेगडे यांनी सांगितलं.

मै जब भी बिखरा हूँ, दुगनी रफ्तारसे निखरा हूँ

यामुळेच धनंजय मुंडे यांच्यावरील डाग हळूहळू पुसट होताना दिसत आहेत. काही वर्षापूर्वी बीडमधील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी भाषणादरम्यान, तुम लाख कोशिशे करो मुझे बदनाम करने की,मै जब भी बिखरा हूं तब तब मै दुगनी रफ्तारसे निखरा हूँ हा शेर सादर केला होता. रेणू शर्मा प्रकरणात त्यांचा हाच शेर लागू होतोय की का असं आता हळूहळू दिसत आहे.

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही : शरद पवार

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना, धनंजय मुंडे यांचं प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं होतं. तसंच पक्षांतर्गत चर्चा होऊन त्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं होतं. मात्र रेणू शर्मा यांच्याविरोधात एकापाठोपाठ एक अशा तीन तक्रारी दाखल झाल्यानंतर, धनंजय मुंडे हे धोक्याबाहेर येताना दिसत आहेत. त्यामुळेच शरद पवार यांनी आज या सर्व प्रकरणानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. “महिलेची तक्रार असल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं होतं, मात्र त्या महिलेविरोधातच तीन जणांनी तक्रार केली आहे. त्यामुळे ACP दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने या प्रकरणाची चौकशी करावी. पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही”, असं शरद पवारांनी ठामपणे सांगितलं.

रेणू शर्मांवर बूमरँग?

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप केल्याने मंत्रिमहोदयांच्या अडचणी वाढल्या. असं असलं तरी रेणू शर्मा यांच्याविरोधातही तक्रारी वाढत असल्याने हे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरॅंग होताना दिसत आहे. कारण रेणू शर्मा यांच्याविरोधात खुद्द धनंजय मुंडे यांनी तर तक्रार केली आहेच, पण त्यांच्याविरोधात इतर तीन तक्रारीही दाखल झाल्या आहेत.

जर केवळ धनंजय मुंडे यांचीच तक्रार असती तर एकमेकांविरोधात तक्रार असं समजून प्रकरणाला तितकंस गांभीर्य आलं नसतं. पण अन्य तीन तक्रारी, त्याही बड्या नेत्यांच्या तक्रारी असल्याने प्रकरण आणखी गंभीर बनलंय.

कृष्णा हेगडेंनी वात पेटवली

भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी सर्वात आधी रेणू शर्माविरोधात तक्रार दिल्याने, धनंजय मुंडे यांच्यावरील दबाव कमी होण्यास सुरुवात झाली. रेणू शर्मा यांनी रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप कृष्णा हेगडे यांनी 14 जानेवारी रोजी केला. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होत्या. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या, असा दावा कृष्णा हेगडे यांनी केला आहे.

..तर माझाही धनंजय मुंडे झाला असता : मनीष धुरी

“जर रेणू शर्माच्या जाळ्यात फसलो असतो तर 2008-09 मध्येच माझा धनंजय मुंडे झाला असता. रेणू शर्मा आणि तिच्या बहिणीला उच्चभ्रू लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याची सवय आहे. कृष्णा हेगडेंनी 2010 मध्ये अनुभव घेतलाय. पण मी 2008- 2009 मध्ये फसणार होतो, मात्र माझं नशीब चांगलं म्हणून मी बचावलो. ही (रेणू शर्मा) आणि हिचं कुटुंब यामधीलच आहे असं वाटतंय”, असं मनीष धुरी म्हणाले.

रिझावान कुरेशींनाही रेणू शर्मांकडून अडकवण्याचा प्रयत्न?

रेणू शर्मांनी जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी नावाच्या तरुणाला छळल्याचा आरोप झाला आहे. पोलिसांकडे असलेल्या कागदपत्रांपैकी काही कागदपत्रे माध्यमांच्या हाती लागली आहेत. यावरुन रेणू शर्मा यांनी कुरेशी यांच्यासोबत सोशल मिडीयावरून ओळख झाल्यानंतर मैत्री केली. त्यानंतर भेटीगाठी, हॉटेलिंग आणि असं बरेच काही घडलं हे जवळपास 2 वर्ष चालले त्यानंतर मात्र या महिलेने रिझवान कुरेशी विरोधात याच आंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केल्याचं यातून समोर येतंय.

ब्लॅकमेलिंगचा खेळ?

या सर्व प्रकारानंतर ब्लॅकमेलिंग हा एकच आरोप आतापर्यंत समोर येत आहे. कालपर्यंत विलन वाटणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवरच एकामागे एक असे तीन आरोप झाले. त्यामुळे धनंजय मुंडेंवरील डाग धुसर होत आहेत आणि धनंजय मुंडेंनी म्हटल्याप्रमाणे “तुम लाख कोशिशे करो मुझे बदनाम करने की,मै जब भी बिखरा हूं तब तब मै दुगनी रफ्तारसे निखरा हूँ” हे खरं होताना दिसत आहे.

VIDEO : धनंजय मुंडे यांचं संग्रहित भाषण – मै जब भी बिखरा हूँ….

(Dhananjay Munde speech tum lakh koshish karo mujhe badnaam karne ki)

संबंधित बातम्या  

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, शरद पवारांची आजही रोखठोक भूमिका

Dhananjay Munde Case : म्हणून धनंजय मुंडेंवरील आरोप ‘गंभीर’ असल्याचं म्हणालो, शरद पवारांचं स्पष्टीकरण

Follow Us
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?