Dhule Lok sabha result 2019 : धुळे लोकसभा मतदारसंघ निकाल

सचिन पाटील

|

Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

धुळे लोकसभा मतदारसंघ : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांनीच बाजी मारली. त्यांनी काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांचा पराभव केला. धुळे लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. यंदा इथे 56.68% मतदानाची नोंद झाली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात 1 टक्क्यांनी घट झाली. या मतदारसंघात भाजपकडून डॉ सुभाष भामरे तर काँग्रेसकडून आमदार […]

Dhule Lok sabha result 2019 : धुळे लोकसभा मतदारसंघ निकाल

Follow us on

धुळे लोकसभा मतदारसंघ : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांनीच बाजी मारली. त्यांनी काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांचा पराभव केला. धुळे लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. यंदा इथे 56.68% मतदानाची नोंद झाली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात 1 टक्क्यांनी घट झाली. या मतदारसंघात भाजपकडून डॉ सुभाष भामरे तर काँग्रेसकडून आमदार कुणाल पाटील यांच्यात लढत झाली. शिवाय इथे आमदार अनिल गोटे अपक्ष रिंगणात होते.  महापालिकेच्या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हातात सूत्रं दिल्यानं भाजप आमदार अनिल गोटे हे नाराज झाले होते. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत बंड पुकारले आणि आपली वेगळी चूल मांडली. मात्र इथे सुभाष भामरे यांनीच बाजी मारली.

धुळे लोकसभा मतदारसंघ निकाल

पक्ष उमेदवारनिकाल
भाजप/शिवसेना सुभाष भामरे (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीकुणाल पाटील (काँग्रेस)
अपक्ष/इतर

2014 आणि 2019 ची आकडेवारी

2014 मध्ये डॉ सुभाष भामरे यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून अमरीश पटेल रिंगणात होते.

धुळे लोकसभाच्या 2019 च्या निवडणुकीत 56.68% टक्के मतदान झालं. तर 2014 मध्ये 58.68% इतके मतदान झालं होतं.

2014 मध्ये एकूण 1643720 इतके मतदारांनी हक्क बजावला होता.

 • धुळे ग्रामीण – 332378
 • धुळे शहर-     235709
 • शिंदखेडा-    294617
 • मालेगाव मध्य 232103
 • मालेगाव बाह्य 282409
 • बागलाण 236514

2019 मध्ये 19 लाख 04 हजार 859 इतके मतदार होते. त्यापैकी 10 लाख 79 हजार 748 इतक्या मतदारांनी हक्क बजावला.

 • धुळे ग्रामीण – 228112
 • धुळे शहर-     154975
 • शिंदखेडा-      186289
 • मालेगाव मध्य- 143295
 • मालेगाव बाह्य – 190033
 • बागलान       –  177044

धुळे लोकसभा मतदार संघातून कोण – कोण खासदार झालेत यावर एक दृष्टीक्षेप  :- 

धुळे लोकसभा मतदारसंघाने आता पर्यंत सोळा खासदार बघितले. यात 1957 ते 1962 या कालावधीतील दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन जनसंघाचे उत्तमराव लक्ष्मणराव पाटील हे विजयी झाले. त्यानंतर मात्र काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. तिसऱ्या लोकसभा निवडणुकीपासून म्हणजे 1962 पासून पाचव्या लोकसभेपर्यंत म्हणजे 1977 पर्यंत काँग्रेसचे चुडामण आनंदा पाटील हे खासदार राहिले. त्यानंतर सहाव्या लोकसभा निवडणुकीत 1977ते 1980 या कालावधीत काँग्रेसचेच विजय नवल पाटील विजयी झाले. त्यानंतरच्या तीन म्हणजेच 15 वर्षापर्यंत म्हणजे सातव्या लोकसभा निवडणुकीपासून नवव्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसचे रेशमा मोतीराम भोये हे खासदार होते. त्यानंतर दहाव्या लोकसभा निवडणुकीत 1991 ते 1996 या कालावधीत काँग्रेसचे बापू हरी चौरे विजयी झाले.

अकराव्या लोकसभा निवडणुकीत 1996 ते 1998 परिवर्तन झालं. भाजपचे साहेबराव सुखराम बागुल हे खासदार झाले. त्यानंतर 1998 ते 1999 या बाराव्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. धनाजी सीताराम अहिरे असं त्यांचं नाव.

तेराव्या लोकसभा निवडणुकीत 1999 ते 2004 या कालावधीत पुन्हा परिवर्तन होत भाजपचे रामदास रुपला गावीत हे खासदार झाले. 2004 ते 2009 या कालावधीत चौदाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बापू हरी चौरे पुन्हा एकदा निवडून आले. त्यानंतर पंधराच्या लोकसभा निवडणुकीत 2009 ते 2014 या कालावधीत भाजपचे प्रताप सोनवणे हे खासदार झाले.

त्यानंतर भाजपची ही विजयी पताका सोळाव्या लोकसभा निवडणुकीत 2014 ते 2019 या  कालावधीत कायम फडकत राहिली. भाजपचे डॉ. सुभाष रामराव भामरे हे विजयी झाले. विजयाची ही पताका भाजप आता 2019 ते 2024 या सतराव्या लोकसभा निवडणुकीत कायम राखेल का?  याविषयी मतदारांमध्ये उत्कंठा लागून होती.

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI