मेधा कुलकर्णींवर अन्याय करून निवडणूक लढवतोय : चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपण विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि कोथरुडच्या मतदारांवर अन्याय (Injustice with Medha Kulkarni) करुन निवडणूक लढवत असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

मेधा कुलकर्णींवर अन्याय करून निवडणूक लढवतोय : चंद्रकांत पाटील

पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपण विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि कोथरुडच्या मतदारांवर अन्याय (Injustice with Medha Kulkarni) करुन निवडणूक लढवत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. ते पुण्यात बोलेवाडी येथील कम्फर्ट झोन सोसायटीत नागरिकांशी बोलत होते. मागील काही काळात चंद्रकांत पाटलांच्या कोथरुडमधील उमेदवारीला (Kothrud Constituency Potics) ब्राह्मण महासंघाकडून जोरदार विरोध झाला आहे. यावरुन ब्राह्मण महासंघात फूटही पडली आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींना डावलून थेट चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिल्याने कोथरुड मतदारसंघात ब्राह्मण समाजाने जोरदार विरोध केला आहे. तो कमी करण्यासाठी चंद्रकांत पाटीलही प्रयत्न करत आहेत. यातूनच त्यांनी हे भावनिक वक्तव्य केलं असावं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, याचा कोथरुडमधील मतदारांवर किती परिणाम होणार हे निवडणूक निकालातच स्पष्ट होणार आहे.

चंद्रकांत पाटलांना होणारा विरोध पाहता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गिरीश बापट यांची कोथरुडमध्ये नियुक्ती केली आहे. तसेच चंद्रकांत पाटलांचा विजय निश्चित करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर ब्राह्मण महासंघात फूट (Partition in Brahman Mahasangh) पडल्याचं समोर आलं आहे. ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे यांनी एक पत्रक काढत (Brahman Mahasangh on Chandrakant Patil) चंद्रकांत पाटलांना महासंघाचा विरोध असल्याचं जाहीर केलं. मात्र, ब्राह्मण महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दवेंनी परस्पर पाठिंब्याचं पत्रक काढल्याचं म्हटलं. यानंतर आनंद दवे यांची ब्राह्मण महासंघाच्या प्रवक्ते पदावरुनही हकालपट्टी करण्यात आली आहे.

आनंद दवे यांनी महासंघाने चंद्रकांत पाटलांना (Brahman Mahasangh Support Chandrakant Patil) पाठिंबा दिल्याचा दावा केला होता. तसेच त्यासाठी एक पत्रकही सादर केले. मात्र, ब्राह्मण महासंघाच्या संबंधित पत्रावर राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांची स्वाक्षरी नसल्याचंही स्पष्टपणे दिसत आहे. कुलकर्णी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

गोविंद कुलकर्णी म्हणाले, “चंद्रकांत पाटलांना पाठिंबा देण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी रविवारी (6 ऑक्टोबर) बैठक घेणार आहेत. यात या मुद्द्यावर चर्चा होईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानुसारच महासंघाच्या उमेदवाराच्या अर्जावरही निर्णय घेतला जाईल. आनंद दवे यांनी राष्ट्रीय अध्यक्षांची परवानगी असल्याचं खोट बोलत पदाधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांना संघटनेतून हकलण्यात येईल. प्रदेशाध्यक्ष याबाबत लवकरच कारवाई करतील.”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI