AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला सबसिडी नको, पण चालत्या कामात खोडा घालू नका : नितीन गडकरी

मला सबसिडी नको, मात्र चालत्या कामात खोडे टाकून त्याला पंक्चर करू नका, असं गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

मला सबसिडी नको, पण चालत्या कामात खोडा घालू नका : नितीन गडकरी
| Updated on: Sep 07, 2019 | 4:43 PM
Share

नागपूर : माझे प्रयोग आऊट ऑफ बॉक्स असतात, त्यामुळे कोणी एकाएकी विश्वास ठेवत नाही. पण ते सगळे प्रयोग मी स्वतः यशस्वी करत असतो. त्यासाठी सरकारी मदत आणि अनुदान/सबसिडी मी घेत नाही. सरकारकडे मदत मागत नाही, असं केंद्रीय रस्ते विकासमंत्री  नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. मला सबसिडी नको, मात्र चालत्या कामात खोडे टाकून त्याला पंक्चर करू नका, असं गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

नागपुरात आज विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या सामंजस्य करार कार्यक्रम पार पडला. त्यावेळी गडकरी बोलत होते.

गडकरींनी सरकारच्या मदतीबाबत यापूर्वीही असंच वक्तव्य केलं होतं. नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत उद्योग व्यवसायाला यशस्वी केलं जाऊ शकते. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. साखरेचं उत्पादन आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, असं गडकरींनी सांगितलं.

दुग्ध विकासासोबतच मत्स्य पालनावरही भर दिल्यास, शेतकऱ्यांना फायदा होईल, असं मत यावेळी पशू आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केलं.

सरकार जिथं हात लावतं, तिथे सत्यानाश होतो : गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काही दिवसापूर्वीच परखड भाष्य केलं होतं. गडकरी अनेकदा आपल्या भाषणातून ते सरकारचे कानही उपटत असतात. यावेळीही त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला होता. सरकारच्या कामाच्या पद्धतीवर बोलताना त्यांनी सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो, असं मत व्यक्त केलं. ते नागपूरमध्ये मदर डेअरी (Mother Dairy) कार्यक्रमात बोलत होते.

संबंधित बातम्या 

सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो : नितीन गडकरी   

नागपूर : काम पूर्ण करा अन्यथा नागरिकांना सांगून धुलाई करु : नितीन गडकरी 

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.