AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांचा हुकमी माणूस शिवस्वराज्य यात्रेला गैरहजर, पद्मसिंह आणि राणा पाटलांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला (NCP Shivswarajya Yatra ) पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ पद्मसिंह पाटील (Dr Padmasinh Patil) आणि त्यांचे आमदार पुत्र राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी पाठ फिरवली.

पवारांचा हुकमी माणूस शिवस्वराज्य यात्रेला गैरहजर, पद्मसिंह आणि राणा पाटलांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित
| Updated on: Aug 26, 2019 | 2:11 PM
Share

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला (NCP Shivswarajya Yatra ) पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ पद्मसिंह पाटील (Dr Padmasinh Patil) आणि त्यांचे आमदार पुत्र राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी पाठ फिरवली. राष्ट्रवादीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष राणा पाटील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर यामुळे शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. डॉ पाटील परिवारातील पिता-पुत्र बरोबरच सून जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील आणिनातू मल्हार पाटील यापैकी एकही जण या शिवस्वराज्य यात्रेला हजर नव्हता.

एकीकडे आमदार राणा पाटील शिवस्वराज्य यात्रेत गैरहजर आहेत, तर दुसरीकडे त्यांनी फेसबुकवर सरकारच्या कौतुकाच्या पोस्ट केली आहे. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या निर्णयाचे पोस्ट करून कौतुक केले आहे . RTE अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गणवेश शाळांनीच देण्याच्या निर्णयाचे आमदार राणांनी कौतुक केले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी येथे झालेल्या सभेला खासदार अमोल कोल्हे , जयंत पाटील,आमदार राहुल मोटे, जीवनराव गोरे उपस्थित होते .

डॉ पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांचे नातेवाईक आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच डॉ पाटील पिता- पुत्र आणि त्यांच्या परिवारातील एकही सदस्य राष्ट्रवादीच्या कार्यक्रमला हजर नव्हता.

उस्मानबाद विधानसभांचं गणित

उस्मानाबाद जिल्ह्यात 4 विधानसभांपैकी उस्मानाबाद आणि परांडा हे राष्ट्रवादीचे 2 मतदारसंघ आहेत. त्यात डॉ. पाटील आणि त्यांचे नातलग असलेल्या मोटे परिवाराची सत्ता आहे. डॉ. पाटील परिवारात 36 वर्षे, तर मोटे परिवारात 25 वर्षांपासून आमदारकी आहे. पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा या मतदारसंघात होत आहे. अशात बदलत्या समीकरणांमुळे आमदार मोटे यांना पक्षीय स्तरावर बळ देण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. आमदार मोटे यांनी मोदी लाटेतही 2014 साली परंडा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक केली. यावेळी ते विजयी चौकार मारण्यासाठी रिंगणात उतरणार आहेत.

संबंधित बातम्या 

डॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल

दिग्गज नातेवाईकाच्या बॅनरवरुनच पवारांचा फोटो गायब  

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.