AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दसरा मेळाव्याचा वाद हायकोर्टात, शिवसेनेची कुणाविरोधात याचिका?

शिवसेनेचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहून न्यायालय आमच्या बाजूने निकाल देईल, असा विश्वास औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलाय.

दसरा मेळाव्याचा वाद हायकोर्टात, शिवसेनेची कुणाविरोधात याचिका?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2022 | 12:59 PM
Share

कृष्णा सोनरवाडकर,  मुंबईः शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळाव्यासाठी (Dussehra Melava ) महापालिकेने परवानगी द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेनं हायकोर्टात (High court) धाव घेतली आहे. लवकरात लवकर यावर सुनावणी घ्यावी, अशी मागणीही शिवसेनेनं केली आहे. पक्षात पडलेल्या उभ्या फुटीमुळे शिवसेनेला पक्षचिन्हापासून प्रत्येक गोष्टीसाठी आता संघर्ष करावा लागतोय. अगदी अनेक वर्षांपासूनच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झगडा करावा लागतोय.

शिवसेनेने अनेक दिवसांपासून महापालिकेकडे शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी अर्ज केला आहे. मात्र महापालिकेकडून ती देण्यात आलेली नाही. शिंदे गटाकडूनही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता. मात्र दोन्ही गटांना यासाठी परवानगी मिळत नसताना दिसल्याने शिंदे गटाने बीकेसीच्या ग्राऊंडवर तयारी केल्याची माहिती हाती आली आहे.

शिवसेनेची कोर्टात धाव

बीएमसीच्या जी नॉर्थ वॉर्ड सहाय्यक आयुक्तांविरोधात शिवसेनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता पालिकेच्या वतीने वकिलांच्या माध्यमातून युक्तिवाद केला जाईल.

सध्याचं राजकारण पाहता शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी एखाद्या गटाला परवानगी दिली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका महापालिकेने काल घेतली होती.

शिवसेना कुणाची, पक्ष नेमका कुणाचा, हाच प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेकडून शिवसेनेच्या अर्जावर काहीही उत्तर देण्यात आले नाही. यावर कोणताही निर्णय घेणं हे कायदा व सुव्यवस्था बिघडवणारं ठरू शकतं, अशी भूमिका महापालिकेने घेतली होती. त्यामुळे गृहविभाग यासंदर्भात निर्णय घेईल, असंही म्हटलं जात होतं.

उद्या कोर्टात सुनावणी

शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता येईल की नाही, या प्रश्नाचं उत्तर उद्या मिळणार आहे. हायकोर्टानं शिवसेनेची याचिका दाखल करून घेतली असून उद्या या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

खैरे काय म्हणाले?

दरम्यान, शिवसेनेचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहून न्यायालय आमच्या बाजूने निकाल देईल, असा विश्वास औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलाय. आम्ही शिवसैनिकांनी तयारी केली आहे. राज्यभरातून शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईत धडकणार आहेत, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी tv9 शी बोलताना दिली.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.