देशभरात तरुणांची भाजपला पसंती; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हाच ट्रेंड दिसेल: दरेकर

| Updated on: Nov 19, 2020 | 12:26 PM

चंद्रकांत पाटील यांनी दोनवेळा पुणे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. त्यांनी पदवीधरांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. | pravin darekar

देशभरात तरुणांची भाजपला पसंती; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हाच ट्रेंड दिसेल: दरेकर
Follow us on

पुणे: बिहार विधानसभा (Bihar Election) आणि देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सुशिक्षित तरुणांना भाजपला पसंती दिल्याचे दिसून आले. राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही हाच ट्रेंड दिसून येईल, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. (Pravin Darekar prediction about graduate constituency election in Maharashtra)

ते गुरुवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील आगामी पदवधीर मतदारसंघाच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. चंद्रकांत पाटील यांनी दोनवेळा पुणे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. त्यांनी पदवीधरांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला यंदा यश मिळेल. गेल्या काही दिवसांत बिहार आणि देशाच्या इतर भागांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पदवीधर तरुणांना भाजपला मतदान केल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही हाच ट्रेंड कायम राहील, असे दरेकर यांनी सांगितले.

तसेच पुण्यातील भाजप नेत्या मेधा कुलकर्णी या पक्षावर नाराज नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मेधाताई प्रचारात फित आहेत. त्या पक्षाला नवीन नाहीत किंवा त्यांच्यासाठी पक्ष नवीन नाही. त्यांचं काय करायचे हे आम्ही बघू, असेही दरेकर यांनी सांगितले.

‘ठाकरे सरकार अस्थिर, एकमेकांमध्ये ताळमेळ नाही’
राज्यातील ठाकरे सरकारची अवस्था म्हणजे कोणाचाही कोणाशी मेळ नसल्यासारखी आहे. त्यामुळे राज्यात अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला सरकारने 100 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, असे सांगितले. ही वीज मोफत दिलीच नाही, उलट कोरोनाच्या काळात नागरिकांना वाढीव बिले आली. हे सरकार जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

‘मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेची मदत घ्यायची का हे वेळ आल्यावर ठरवू’
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ घेणार का, असा प्रश्न प्रवीण दरेकर यांना विचारण्यात आला. त्यावर दरेकर यांनी म्हटले की, भाजप मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. मात्र, निवडणूक जाहीर झाल्यावर मनसेची साथ घ्यायची की नाही, याबाबतही विचार करू, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

राज्यपालांविषयी महाविकासआघाडीचे मत दुराग्रही, अधिकारात, नियमात जे असेल तेच राज्यपाल करतील : प्रवीण दरेकर

‘साधू-संतांच्या हत्येविरोधात आवाज उठवणंही ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा’, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

शिवसेनेकडून मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप; प्रवीण दरेकर यांची टीका

(Pravin Darekar prediction about graduate constituency election in Maharashtra)