Ekanth Shinde Tweet : ‘आम्ही स्वखुशीने…’ असं आमदारांकडून वदवून घेतलं जातंय का? चर्चा तर होणारच! शिंदेच्या ट्वीटर हॅन्डलचा एक्सरे

शिंदे गटातील ज्या आमदारांचे व्हिडीओ ट्वीट करण्यात आलेले आहेत, त्यात सर्व आमदार आपण स्वखुशीने शिंदे यांच्यासोबत असल्याचं दाखवण्यासाठी गुवाहाटीमध्ये आलो आहोत, ते सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 

Ekanth Shinde Tweet : 'आम्ही स्वखुशीने...' असं आमदारांकडून वदवून घेतलं जातंय का? चर्चा तर होणारच! शिंदेच्या ट्वीटर हॅन्डलचा एक्सरे
ट्वीटरचा खुबीनं वापर करण्यात शिंदेंना यश?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 4:17 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांचं 21 जूनपासून ट्वीटर पाहिलं तर एक गोष्ट फार बारकाईने लक्षात येते. त्यांच्या प्रत्येक ट्वीटमध्ये बंडखोरीची भूमिका ठासून भरली आहे. आपण शिवसेनेतच (Shiv sena) आहोत आणि शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही, असंही ते म्हणाले. शिवाय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नावाचाही उल्लेख वारंवार त्यांच्या ट्वीटमध्ये दिसून आला. सूरतहून जेव्हा एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले, त्यानंतर त्यांना आमदारांचा अधिकच पाठिंबा वाढला. एक-एक करुन आमदार गुवाहाटीत दाखल होत गेले. यात कॅबिनेटच्या (Maharashtra Political Crisis) मंत्र्यांपासून राज्यमंत्र्यांपर्यंत ते अगदी अपक्ष आमदारही त्यांच्या बाजूने उभे राहिले. बंडखोरीच्या नऊ दिवसांच्या काळात एकनाथ शिंदे यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले. आमदारांना पळवून घेऊन जाण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. आमदारांमध्ये गुवाहाटीत भांडणं झाल्याचा आरोप करण्यात आला.

आपल्यावर होत असलेल्या सर्व आरोपांना एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून थेट उत्तरं दिली. सुरुवातील फक्त शब्द लिहिले. आणि नंतर नंतरच व्हिडीओच्या माध्यमातूनच आमदारांकडून भूमिका स्पष्ट करणारे व्हिडीओ अपलोड केले गेले. बंडखोरी केल्यानंतर सूरतला गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी 21 जूनला माध्यमांशी बोलणं टाळलं होतं. त्यानंतर रात्री गुवाहाटीला जेव्हा सर्व आमदार पोहोचले तेव्हा त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं? त्यासाठी हा व्हिडीओ पाहा :

हे सुद्धा वाचा

बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी केलेलं पहिलं ट्वीट :

बंडखोरी केल्यानंतर सत्तेसाठी कधीही प्रतारणा करणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली होती. आपण कट्टर शिवसैनिक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

गटनेते पदावरुन काढल्यानंतरचं ट्वीट

सुनील प्रभू यांनी आमदारांना मुंबईत येण्यासाठी प्रतोद या नात्याने फर्मान काढलं होतं. पण बंडखोरांनी त्याला केराची टोपली दाखवली होती.

उद्धव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हनंतर चार मागण्या शिंदेनी मांडल्या

अखेर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत राज्याला संबोधित केलं. या संबोधनानंतर एकनाथ शिंदे यांनी चार मुद्दे मांडून आपली आणि बंडखोरांची भूमिका स्पष्ट केलेली.

संजय शिरसाट यांनी लिहिलेलं पत्र एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं होतं

पत्रानंतर व्हिडीओ ट्वीट करत एकनाथ शिंदेंचा अधिक आक्रमक पवित्रा

निलंबनाच्या कारवाईनंतर शिंदे यांचं रोखठोक प्रत्युत्तर

संजय शिरसाठ यांच्यानंतर यामिनी जाधव यांचं ट्वीट :

संपूर्ण महाराष्ट्रात बंडखोरीचे पडसाद, त्यानंतर बंडखोर आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

आमदार क्रमांक 3 : आमदार महेश शिंदे यांचा व्हिडीओ ट्वीट

अनैसर्गिक युतीतून बाहेर पडण्याचं ठाकरेंना आवाहन

आमदार क्रमांक चार : चिमणराव पाटील म्हणाले?

संतप्त झालेल्या शिवसैनिकांना शांत राहण्याचं शिंदेंचं आवाहन

आमदारांचं बर्थडे सेलिब्रेशन

आमदार क्र. पाच : आमदारांमध्ये भांडणं झाल्याचा आरोप आणि त्यावरचं स्पष्टीकरण

आमदार क्रं. 6 : भरतशेट गोगावलेंची अजित पवारांवर टीका

संजय राऊतांचा ट्वीटरमधून प्रत्युत्तर

दाऊदवरुन आरोप करत शिंदेचा टोला

माजी आमदाराचा व्हिडीओ ट्वीट करत सवाल

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी लिहिलेलं पत्र शिंदेंकडून रीट्वीट

आमदार क्र. 7 : शंभुराज देसाईंकडून ठाकरेंवर आरोप

सुप्रीम कोर्टानं सुनावणी 11 जुलैपर्यंत पुढे ढकलल्यावर शिंदेंचं ट्वीट

आमदार क्र. 8 : उदय सामंत अखेरच्या क्षणी गुवाहाटीत गेले, कारण..

सध्या एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नसल्याचे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी या व्हिडीओमधून दिले होते.

चर्चा तर होणारच!

एकनाथ शिंदे यांच्याकडून सोशल मीडियावर आता त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे व्हिडीओ ट्वीट केले जात आहेत. हे व्हिडीओ बारकाईने पाहिल्यास, यात एक गोष्ट प्रामुख्यानं नमूद होते. शिंदे गटातील ज्या आमदारांचे व्हिडीओ ट्वीट करण्यात आलेले आहेत, त्यात सर्व आमदार आपण स्वखुशीने शिंदे यांच्यासोबत असल्याचं दाखवण्यासाठी गुवाहाटीमध्ये आलो आहोत, ते सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

आमदार क्र. 9

आमदार क्र. 10

आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर टीकेचे बाण

आमदार क्र. 11

आमदार क्र. 12

आमदार क्र. 13

आसाममधील पूरग्रस्तांना 51 लाख

आमदार क्र. 14

आमदार क्र. 15

आमदार क्र. 16

आमदार क्र. 17

आमदार क्र. 18

आमदार क्र. 19

फक्त ट्वीटच नव्हे तर हॉटेलच्या आतमधील बैठकीचे व्हिडीओ, बर्थडे सेलिब्रेशन, आमदारांची थट्टा मस्करी, त्यांचं स्वागत करतानाचे हॉटेलच्या लॉबीतील व्हिडीओही वारंवार समोर आले होते.

वाचा महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींची लाईव्ह अपडेट्स : इथे क्लिक करा. Eknath Shinde News, Maharashtra Politics LIVE

काय आहे नेमकं पक्षीय बलाबल?

महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133
Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.