मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांचं 21 जूनपासून ट्वीटर पाहिलं तर एक गोष्ट फार बारकाईने लक्षात येते. त्यांच्या प्रत्येक ट्वीटमध्ये बंडखोरीची भूमिका ठासून भरली आहे. आपण शिवसेनेतच (Shiv sena) आहोत आणि शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही, असंही ते म्हणाले. शिवाय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नावाचाही उल्लेख वारंवार त्यांच्या ट्वीटमध्ये दिसून आला. सूरतहून जेव्हा एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले, त्यानंतर त्यांना आमदारांचा अधिकच पाठिंबा वाढला. एक-एक करुन आमदार गुवाहाटीत दाखल होत गेले. यात कॅबिनेटच्या (Maharashtra Political Crisis) मंत्र्यांपासून राज्यमंत्र्यांपर्यंत ते अगदी अपक्ष आमदारही त्यांच्या बाजूने उभे राहिले. बंडखोरीच्या नऊ दिवसांच्या काळात एकनाथ शिंदे यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले. आमदारांना पळवून घेऊन जाण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. आमदारांमध्ये गुवाहाटीत भांडणं झाल्याचा आरोप करण्यात आला.
आपल्यावर होत असलेल्या सर्व आरोपांना एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून थेट उत्तरं दिली. सुरुवातील फक्त शब्द लिहिले. आणि नंतर नंतरच व्हिडीओच्या माध्यमातूनच आमदारांकडून भूमिका स्पष्ट करणारे व्हिडीओ अपलोड केले गेले. बंडखोरी केल्यानंतर सूरतला गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी 21 जूनला माध्यमांशी बोलणं टाळलं होतं. त्यानंतर रात्री गुवाहाटीला जेव्हा सर्व आमदार पोहोचले तेव्हा त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं? त्यासाठी हा व्हिडीओ पाहा :
बंडखोरी केल्यानंतर सत्तेसाठी कधीही प्रतारणा करणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली होती. आपण कट्टर शिवसैनिक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
सुनील प्रभू यांनी आमदारांना मुंबईत येण्यासाठी प्रतोद या नात्याने फर्मान काढलं होतं. पण बंडखोरांनी त्याला केराची टोपली दाखवली होती.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
अखेर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत राज्याला संबोधित केलं. या संबोधनानंतर एकनाथ शिंदे यांनी चार मुद्दे मांडून आपली आणि बंडखोरांची भूमिका स्पष्ट केलेली.
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. #HindutvaForever
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
ही आहे आमदारांची भावना… pic.twitter.com/U6FxBzp1QG
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांस जाहीर पत्र लिहून तमाम शिवसैनिकांची व्यथा मांडणारे शिवसेना आमदार श्री संजय शिरसाठ यांची व्हिडिओ प्रतिक्रिया…. pic.twitter.com/Due5oDISAC
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय?
तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!
घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही.
यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.#RealShivsainik— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
शिवसेना आमदार सौ यामिनी (ताई) जाधव यांनी सांगितला भावपूर्ण प्रसंग…. आम्ही सर्व शिवसेनेतच पण हा निर्णय घेण्याची वेळ का आली हे सर्वांनी समजुन घ्यावं….
संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही याचे मनात शल्य… pic.twitter.com/cAkFEocOYk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 24, 2022
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.#MVAisAntiShivsena pic.twitter.com/lX2qjVTxGM
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022
कोरेगाव, जिल्हा सातारा येथील शिवसेना आमदार श्री.महेश शिंदे यांनी सांगितले आक्रमक भुमिका घेण्याचे कारण… pic.twitter.com/neh3MzuhAc
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022
नैसर्गिक युती व्हावी ही अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. म्हणूनच या विचारधारेसाठी केलेल्या या बंडाच्या भूमिकेला पक्षातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक आमदार आणि १० सहयोगी अपक्ष आमदारांचे समर्थन आहे.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022
जळगाव जिल्ह्यातील पारोळा मतदारसंघाचे आमदार श्री.चिमणराव आबासाहेब पाटील यांची सुस्पष्ट भूमिका….
आम्ही गेली ३० वर्ष प्रथम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संघर्ष करत आहोत. काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत आमचा परंपरागत संघर्ष होता आणि यापुढेही राहील. pic.twitter.com/2TqHPHpnOo
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022
प्रिय शिवसैनिकांनो,
नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित…. आपला एकनाथ संभाजी शिंदे.#MiShivsainik— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022
भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस आज गुवाहाटीमध्ये सर्व सहकारी आमदारांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.#WeSupportEknathShinde pic.twitter.com/TxaLOZ4kat
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2022
#राधानगरी मतदारसंघाचे आमदार श्री.प्रकाश अबिटकर यांचे काल अन्य आमदारांच्या सोबत भांडण झाल्याची बातमी काही माध्यमांनी दिलेली होती. ही बातमी संपूर्णपणे खोडसाळ असून त्यांनी स्वतः या वृताचे खंडन केले आहे.#WeSupportEknathShinde@abitkar_prakash pic.twitter.com/OyFhHZUWSa
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2022
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवसेना आमदारांची गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कधी साधी बैठक तरी घेतली का..?
उलटपक्षी राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांना उपमुख्यमंत्री निधी देत होते, ताकद देत होते. pic.twitter.com/NeLOhTRy42
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2022
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर….
तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू…#MiShivsainik @rautsanjay61— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2022
मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…?
यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..#MiShivsainik @rautsanjay61— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2022
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का?असासवाल शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनापक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे साहेबांना विचारला आहे pic.twitter.com/WAIq6GeMp1
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2022
#MiShivsainik https://t.co/WzqI5lKaLm
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2022
#सातारा जिल्ह्यातील #पाटण विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच गृह राज्यमंत्री श्री.शंभूराजे देसाई यांनी शिवसेना पक्षासोबत कसा दुजाभाव झाला याचे एक मनोगत मांडले ते खालीलप्रमाणे आहे…@shambhurajdesai#MiShivsainik pic.twitter.com/b3ywV8Tb0s
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2022
हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!#realshivsenawins
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2022
सध्या एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नसल्याचे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी या व्हिडीओमधून दिले होते.
शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी आपले मनोगत मांडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे.@samant_uday #MiShivsainik pic.twitter.com/hXgmTMibEB
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 28, 2022
एकनाथ शिंदे यांच्याकडून सोशल मीडियावर आता त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे व्हिडीओ ट्वीट केले जात आहेत. हे व्हिडीओ बारकाईने पाहिल्यास, यात एक गोष्ट प्रामुख्यानं नमूद होते. शिंदे गटातील ज्या आमदारांचे व्हिडीओ ट्वीट करण्यात आलेले आहेत, त्यात सर्व आमदार आपण स्वखुशीने शिंदे यांच्यासोबत असल्याचं दाखवण्यासाठी गुवाहाटीमध्ये आलो आहोत, ते सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
#नाशिक जिल्हा #नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री.सुहास अण्णा कांदे यांचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे…#MiShivsainik pic.twitter.com/Zm1y5atvLT
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 28, 2022
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत.#MiShivsainik pic.twitter.com/OrW8krPRSo— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 28, 2022
एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?#donttrickmaharashtra
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 28, 2022
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांचे स्पष्टीकरण.
मविआतील घटकपक्ष राष्ट्रवादी आमचा परंपरागत विरोधक असून माझ्या मतदारसंघात मी पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला उपमुख्यमंत्री यांचेकडून ताकद मिळते.म्हणून मविआ आम्हाला मान्य नाही.#MiShivsainik pic.twitter.com/n9p6fwPUgd— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 28, 2022
#रत्नागिरी जिल्ह्यातील #दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री.योगेश रामदास कदम यांचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे…@iYogeshRKadam#MiShivsainik pic.twitter.com/k2sdo1o33j
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 28, 2022
#पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे….
महाविकास आघाडी नको म्हणून आमचा हा निर्णय. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही, नैसर्गिक युतीसाठी आमचा आग्रह आहे.#MiShivsainik pic.twitter.com/mr330WFF0D
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 28, 2022
आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय.#ShivsenaMaharashtraWithAssam
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2022
#संभाजीनगर जिल्ह्यातील #वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्राध्यापक श्री.रमेश बोरणारे यांचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे.…#MiShivsainik pic.twitter.com/OwDkqhEEfZ
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2022
#धाराशिव जिल्ह्यातील #उमरगा मतदारसंघाचे शिवसेना आमदार श्री.ज्ञानराज चौगुले यांचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे….
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्व जोपासणारी मी व्यक्ती आहे…#MiShivsainik pic.twitter.com/cF5tmS0Wr8
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2022
#रायगड जिल्हा #अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री.महेंद्र दळवी यांचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे…
एकनाथ शिंदेंनी जो हिंदुत्वाचा निर्णय घेतला आहे, त्याकरिता रायगड जिल्ह्यातील आम्ही तीनही आमदार एकत्रित आलो आहोत.#MiShivsainik pic.twitter.com/4t2drEaiOv
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2022
#रायगड जिल्हा #कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री.महेंद्र सदाशिव थोरवे यांचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे…
रायगड जिल्ह्यातील आम्ही तीन ही आमदार एकनाथजी शिंदे यांच्या समवेत आहोत#MiShivsainik pic.twitter.com/Tcr76ss876
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2022
रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार @BharatGogawale यांचे स्पष्टीकरण…
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे प्रखर विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मिळून शिवसेनेला संपवायला निघालेले आहेत.#MiShivsainik pic.twitter.com/wifaBroisq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2022
#संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री.संजय शिरसाट यांचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे….
आमच्यावर कोणताही दबाव नाही. आम्ही स्वखुशीने येथे गुवाहाटीला आलो असून लवकरच मुंबई मध्ये येत आहोत. #MiShivsainik pic.twitter.com/YZkc5dP2El
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2022
फक्त ट्वीटच नव्हे तर हॉटेलच्या आतमधील बैठकीचे व्हिडीओ, बर्थडे सेलिब्रेशन, आमदारांची थट्टा मस्करी, त्यांचं स्वागत करतानाचे हॉटेलच्या लॉबीतील व्हिडीओही वारंवार समोर आले होते.
महाराष्ट्र राज्य विधानसभा | सत्तेचं गणित |
---|---|
विधानसभेचे एकूण सदस्य | 288 |
दिवंगत सदस्य | 01 |
कारगृहात सदस्य | 02 |
सध्याची सदस्य संख्या | 285 |
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार | 39 |
आता सभागृहाची सदस्य संख्या | 285 |
बहुमताचा आकडा | 143 |
भाजपचं संख्याबळ | भाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172 |
मविआचं संख्याबळ | शिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111 |
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ? | भाजप (106)+ अपक्ष (27) = 133 |