माझ्या मुलीला पाडायला खुद्द पवार आले, माझीच प्रतिष्ठा वाढली : खडसे

गेल्या आठवड्यात शरद पवार स्वतः जळगावात आले आणि म्हणाले या अपक्षाला आमचा पाठिंबा. वा रे वा राष्ट्रीय नेते. असं असेल तर त्यांना राष्ट्रीय नेते म्हणावं तरी कसं? असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला

माझ्या मुलीला पाडायला खुद्द पवार आले, माझीच प्रतिष्ठा वाढली : खडसे
Follow us
| Updated on: Oct 16, 2019 | 8:46 AM

जळगाव : नाथाभाऊंना पाडण्यासाठी नाही, तर नाथाभाऊंच्या मुलीला पाडण्यासाठी पवारसाहेब इथे आले. चला माझीच इज्जत वाढली, असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला (Eknath Khadse taunts Sharad Pawar) लगावला. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली, त्यावेळी खडसे बोलत होते.

‘काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, काही आपले लोक सगळेच नाथाभाऊंना पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. पण पैलवान तेल लावून तयार आहे. माझ्यासमोर पंजा नाही, घड्याळ नाही, पण अपक्ष बंडखोर उभा आहे. त्याला अजून शिवसेनेने काढला नाही. दहा जणांची हकालपट्टी झाली, पण याला काढला नाही. म्हटलं पोरगं आमचं आहे, जाऊदे काय काढताय. नाथाभाऊच्या विरुद्ध उभं आहे. नाथाभाऊंना पाडायला सगळे एकत्र आले आहेत.’ असं एकनाथ खडसे म्हणताच हशा पिकला.

‘गेल्या आठवड्यात शरद पवार स्वतः आले आणि म्हणाले या अपक्षाला आमचा पाठिंबा. वा रे वा राष्ट्रीय नेते. असं असेल तर त्यांना राष्ट्रीय नेते म्हणावं तरी कसं? नाथाभाऊंना पाडण्यासाठी नाही, नाथाभाऊंच्या मुलीला पाडण्यासाठी पवारसाहेब इथे आले. चला माझीच इज्जत वाढली.’ अशा कानपिचक्याही खडसेंनी (Eknath Khadse taunts Sharad Pawar) लागवल्या.

खडसे-मेहतांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे घरी बसवलं, नड्डांची अप्रत्यक्ष कबुली

‘नरेंद्रभाई मोदींसारखा पंतप्रधान आपल्याला पाहायला मिळाला. एका चहावाल्याला, एका टपरीवर काम करणाऱ्याला, एका गरीब कुटुंबातील मुलाला, दामोदरदास मोदी यांच्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या पोटी जन्माला आलेल्या एका मुलाला पंतप्रधानपद मिळतं. आणि आम्हाला आत्मविश्वास वाटला, आपण का नाही होऊ शकत पंतप्रधान? होणार-न होणार ही गोष्ट वेगळी, पण जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण झाला की गरीबांच्या व्यथा जाणणारा. गरीबांच्या घरात वाढलेला एक पंतप्रधान या देशाला मिळू शकतो’ अशा शब्दात खडसेंनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली.

खडसेंनी आपल्या भाषणाला हिंदीतून सुरुवात केली. त्यावेळी स्मृती इराणी यांनी त्यांना मराठीतून बोलण्याची विनंती केली. मात्र, खडसेंनी ‘मला हिंदीतून भाषण करायला आवडते. मी हिंदी विसरु नये म्हणून कधी कधी हिंदीतून भाषण करतो. माझीही संसदेत यायची मनापासून इच्छा होती’, असं सांगत आपल्या मनातील भावना जाहीरपणे सांगून टाकली.

जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांचा पत्ता कापत भाजपने त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार नाही. परंतु नाराज झालेले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध सर्वपक्षीय अशी रंगतदार लढत होणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.