एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, मुलीनंतर आता पत्नी मंदाकिनी खडसेंनाही ईडीकडून समन्स

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. मंदाकिनी खडसे यांना उद्या ईडीसमोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं आहे.

एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, मुलीनंतर आता पत्नी मंदाकिनी खडसेंनाही ईडीकडून समन्स
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 8:20 PM

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण, खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. मंदाकिनी खडसे यांना उद्या ईडीसमोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं असून, पुन्हा एकदा खडसे कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Eknath Khadse’s wife Mandakini Khadse summoned by ED)

यापूर्वी 8 जुलै रोजी एकनाथ खडसे यांची ईडी कार्यालयात तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली होती. पुण्यातील भोसरी MIDC भूखंड व्यवहार प्रकरणात जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावलं होतं. मंदाकिनी खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांना एका निवेदनाद्वारे 14 दिवसांची वेळ मागितली होती.

मंदाकिनी खडसेंना समन्स का?

भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई अटकेत आहेत. याच प्रकरणी मंदाताई खडसे यांना ईडीने उद्या हजर होण्याची नोटीस बजावली आहे. त्या हजर होणार काय या कडेच आता लक्ष आहे. भोसरी गैरव्यवहार प्रकरणी खडसे कुटुंब गोत्यात आले असतांनाच गेल्या आठवड्यात त्यांच्याशीच संबंधीत असणार्‍या मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाची माहिती मिळवण्यासाठी ईडीने जिल्हा बँकेला नोटीस बजावली आहे. या बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे असल्याने राजकीय आणि सहकार क्षेत्रात यामुळे खळबळ उडालेली आहे. यातच आता मंदाताई खडसे यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावल्याने यात काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खडसेंची 9 तास ईडी चौकशी

दरम्यान, एकनाथ खडसे 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. 9 तासांच्या चौकशीनंतर रात्री आठच्या सुमारास ते कार्यालयाबाहेर पडले. यावेळी एकनाथ खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलणं टाळलं. चौकशी झाल्यावर ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ते थेट आपल्या गाडीत बसून रवाना झाले. त्यांच्या वकिलांनी माध्यमांना या चौकशीची माहिती दिली. यावेळी वकिलांनी ईडी चौकशीसाठी जितक्या वेळा बोलावेल तितक्या वेळा हजर राहण्याचं खडसेंनी आश्वासन दिल्याचं सांगितलं.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.

इतर बातम्या :

680 रुपये असलेला बदाम अचानक हजाराच्या वर कसा गेला? अफगाण युद्धाचे परिणाम थेट तुमच्या खिशावर?

VIDEO : नाशिकमध्ये तृतीयपंथीयांचा राडा, टोलनाक्यावर प्रवाशांना शिवीगाळ-बाचाबाची, नंतर मारहाण, तुफान हाणामारीचा व्हिडीओ समोर

Eknath Khadse’s wife Mandakini Khadse summoned by ED

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.