AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फाईल मंजुरी’वरून महायुतीत ठिणगी, शिंदेकडून थेट अमित शाहांकडे तक्रार? नेमकं काय घडलं?

अर्थखात्याकडून शिवसेनेच्या फाईल्स वेळेवर मंजूर झाल्या पाहिजे, यासाठी शिंदे यांनी शाहांकडे आग्रह धरल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

'फाईल मंजुरी'वरून महायुतीत ठिणगी, शिंदेकडून थेट अमित शाहांकडे तक्रार? नेमकं काय घडलं?
amit shah and eknath shinde and ajit pawar
| Updated on: Apr 12, 2025 | 4:24 PM
Share

Amit Shah And Eknath Shinde : राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. या सरकारमध्ये सर्वकाही आलेबल असल्याची चर्चा आहे. मात्र सत्ता स्थापन झाल्यापासून अनेक मुद्द्यांवरून महायुतीतील घटकपक्षांतील मतभेद समोर आलेले आहेत. पालकमंत्रिपदावरून तर महायुतीमध्या चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. दरम्यान, अर्थखात्याकडून आमच्या फाईली रोखून धरल्या जातात, असा आरोप एकनाथ शिंदे यांच्या पक्षांचे आमदार आणि मंत्री करतात असा दावा केला जातो. आता हाच वाद केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या दरबारी पोहोचल्याचे म्हटले जात आहे.

 अर्थखात्यासंदर्भात नेमकी काय तक्रार केली?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यादरम्यान, त्यांनी रायगडमध्ये असताना भाषणही केले. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भोजनही केले. मात्र त्याआधी एकनाथ शिंदे यांनी शाहा यांच्यासोबतच्या बैठकीत महाराष्ट्राच्या अर्थखात्याबाबत तक्रार केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमच्या फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, अशी तक्रारही शिंदेंनी शाहांकडे केल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

पुण्यात रात्री झाली होती भेट

शिंदेंच्या मंत्र्यांच्या फाईली अर्थखात्याकडून लवकर मंजूर होत नसल्याचा वाद अर्थखात्याकडे पोहोचला आहे. आमदार आणि आमच्या मंत्र्यांची फाईल्स लवकर मंजूर होत नाहीत, अशी तक्रार शिंदे यांनी शाहांकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे. अमित शाहा आणि एकनाथ शिंदे यांची काल (11 एप्रिल) पुण्यात भेट झाली. याच भेटीत यासंदर्भात चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे.

पालकमंत्रिपदावर मार्ग काढण्याचेही साकडे

सोबतच अर्थखात्याकडून शिवसेनेच्या फाईल्स वेळेवर मंजूर झाल्या पाहिजे, यासाठी शिंदे यांनी शाहांकडे आग्रह धरल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. सोबतच या बैठकीत रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा वाद सोडवावा, अशीही मागणी शिंदे यांनी शाहा यांच्याकडे केल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.

वादावार सुटणार का?

दरम्यान, आता राज्यातील फाईल्सच्या मंजुरीचा आणि पालकमंत्रिपदाचा विषय थेट अमित शाहांकडे गेल्यामुळे हे दोन्ही विषय मार्गी लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.