AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : अजून दोन आमदार गुवाहाटीत दाखल, अपक्ष आमदार गीता जैन आणि किशोर जोरगेवार शिंदे गटात सहभागी, संख्या 49 वर!

एकनाथ शिंदे गटातील आमदारांची संख्या 50 च्या जवळ पोहोचली आहे. सकाळी चार आमदार गुवाहाटीत पोहोचल्यानंतर आता अजून दोन आमदार गुवाहाटीच्या हॉटेल रेडिसन्स ब्ल्यूमध्ये दाखल झाले आहेत. त्यात अपक्ष आमदार गीता जैन आणि आमदार किशोर जोरगेवार यांचा समावेश आहे.

Eknath Shinde : अजून दोन आमदार गुवाहाटीत दाखल, अपक्ष आमदार गीता जैन आणि किशोर जोरगेवार शिंदे गटात सहभागी, संख्या 49 वर!
गीता जैन आणि किशोर जोरगेवार शिंदे गटात सहभागीImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jun 23, 2022 | 11:33 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदारांची संख्या 50 च्या जवळ पोहोचली आहे. सकाळी चार आमदार गुवाहाटीत पोहोचल्यानंतर आता अजून दोन आमदार गुवाहाटीच्या हॉटेल रेडिसन्स ब्ल्यूमध्ये दाखल झाले आहेत. त्यात अपक्ष आमदार गीता जैन (Geeta Jain) आणि आमदार किशोर जोरगेवार यांचा समावेश आहे. या दोन्ही आमदारांचं शिंदे गटात सहभागी अन्य आमदारांकडून स्वागत करण्यात आलंय. या दोन अपक्ष आमदारांसह आता शिंदे गटातील आमदारांची संख्या 49 झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे पाय अजून खोलात जात असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही वेळापूर्वी कृषीमंत्री दादा भुसे, आमदार संजय राठोड आणि रविंद्र फाटकही गुवाहाटीत पोहोचले आहेत.

तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही – शिंदे

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर शिंदे यांच्यासह 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय. अरविंद सावंत आणि अजय चौधरी यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय. ‘कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे’, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय.

शिवसेनेकडून शिंदे गटातील 12 बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी

बंडाळीनंतर आता बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेकडून खेळी करण्यात आलीय. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार किंवा तो गट शिवसेना पक्षादेशाचं उल्लंघन करत आहेत. त्यामुळे त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत, नवनियुक्त गटनेते अजय चौधरी अजून काही आमदार आणि नेते यांच्या शिष्टमंडळानं विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेटली आहे. शिवसेनेकडून एकूण 12 आमदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार