AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे माझे जीवाभावाचे मित्र, संजय राऊतांकडून बंडखोर नेत्याला चुचकारण्याचं काम सुरु?

Eknath Shinde News : गटनेते पदावरुन हटवल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याचं त्यांनी स्वतःच बोलून दाखवलं होतं.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे माझे जीवाभावाचे मित्र, संजय राऊतांकडून बंडखोर नेत्याला चुचकारण्याचं काम सुरु?
संजय राऊतांचं मोठं विधानImage Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jun 22, 2022 | 10:57 AM
Share

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर संजय राऊतांनी (Sanjay Raut) महत्त्वाचं विधान केलं. एकनाथ शिंदे माझे जीवाभावाचे मित्र आहेत. पक्षात त्यांची कुणाशीही नाराजी नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी माझं बोलणं झालंय, असंही त्यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही मागण्या नाहीत. त्यांच्या कोणत्याही अटीशर्थी नाहीत, असं वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं. ते बुधवारी सकाळी मुंबईत (Mumbai News) पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचे आता अर्थ आणि राजकीय संदर्भही तपासले जात आहेत. तसंच राऊतांचं विधान हे बंडखोर एकनाथ शिंदे यांना चुचकारण्याचा प्रयत्न आहे का, अशीही एक शंका राजकीय जाणकार घेत आहेत. कारण सकाळीच एकनाथ शिंदेंनी उघड नाराजी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केली होती. उद्धव ठाकरेंनाही याबाबत कळवलं होतं. मग संजय राऊत नेमकं असं कोणत्या आधारावर बोलले, अशी शंका घेतली जातेय.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

आज सकाळी तासभर एकनाथ शिंदेंशी बोलणं झालंय, असं राऊतांनी सांगितलंय. सगळे शिवसेनेत आहेत, शिवसेनेच राहणार, उद्धव ठाकरेंचं नेतृत्त्व त्यांना मान्य आहे. ठाणे, कल्याण डोंबिवलीचा सगळा कारभार एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. तिथे शिंदेचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. एकनाथ शिंदे माझे जीवाभावाचे मित्र आहेत. पक्षात त्यांची कुणाशीही नाराजी नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, अशी माहिती राऊतांनी दिलीय. माझी दीर्घकाळ शिंदेंशी चर्चा झाली आहे, अशी माहितीही राऊतांनी दिली.

जीवभावाचे मित्र?

एकनाथ शिंदे फक्त आमचे सहकारी नाहीत. तर आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. काही गोष्टी उगाचच वाढवून, फुगवून समोर दाखवल्या जात आहेत. तसं काहीही नाहीये, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. तर दुसरीकडे शरद पवारांशीही काल, आज चर्चा झाली. दिवसभरात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

शिंदेची खदखद टीव्ही 9 मराठी वर

दरम्यान, गटनेते पदावरुन हटवल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याचं त्यांनी स्वतःच बोलून दाखवलं होतं. टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची टिप्पणी केलेली होती. मी पक्षादेश मोडला नाही, वेगळा निर्णय घेतला नाही, पक्षविरोधी काम केलं नाही, माझ्याकडे आमदारांचं पाठिंबा असतानाही मला गटनेते पदावरुन हटवलं. एकीकडे मिलिंद नार्वेकर यांना चर्चेला पाठवलं आणि दुसरीडे गटनेते पदी दुसऱ्याचीच नियुक्ती केली. हे बरोबर नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. मात्र राऊतांनी शिंदे कुणावरच नाराज नाही, असं म्हटलं.

दोन परस्परविरोधी वक्तव्यांमुळे शिवसेनेत खळबळ उडाली असल्याचं स्पष्ट आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आपल्याला असल्याचं टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना म्हटलं होतं.

वाचा एकनाथ शिंदेच्या बंडाचे LIVE अपडेट्स, इथे क्लिक करा : Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये राहण्याची सोय

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार